विरोधी पक्षाच्या खासदारांनी मंत्र्याला घेरले, बेदम मारले, ‘या’ देशाच्या संसदेत राडा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:04 IST2026-02-12T14:04:13+5:302026-02-12T14:04:41+5:30

Fight In Turkey Parliament : युरोपमधील तुर्कीएच्या संसदेमध्ये नुकताच तुफान राडा झाला. येथे विरोधी पक्षांच्या खासदारांनी नवनियुक्त न्यायमंत्र्यांना संसदेतच गाठून त्यांना बेदम मारहाम केली. विरोधी पक्षांच्या या खासदारांनी आधी मंत्र्यांना घेरले. त्यानंतर त्यांच्यावर एकापाठोपाक बुक्के मारले.  

Fight In Turkey Parliament : Opposition MPs surround minister, beat him up, cause ruckus in 'Turkey's parliament | विरोधी पक्षाच्या खासदारांनी मंत्र्याला घेरले, बेदम मारले, ‘या’ देशाच्या संसदेत राडा   

विरोधी पक्षाच्या खासदारांनी मंत्र्याला घेरले, बेदम मारले, ‘या’ देशाच्या संसदेत राडा   

भारतात सध्या सुरू असलेलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कमालीचं वादळी ठरत आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप आणि टीकाटिप्पण्यांमुळे संसदेची दोन्ही सभागृहं दणाणून जात आहेत. दरम्यान, युरोपमधील तुर्कीएच्या संसदेमध्ये नुकताच तुफान राडा झाला. येथे विरोधी पक्षांच्या खासदारांनी नवनियुक्त न्यायमंत्र्यांना संसदेतच गाठून त्यांना बेदम मारहाम केली. विरोधी पक्षांच्या या खासदारांनी आधी मंत्र्यांना घेरले. त्यानंतर त्यांच्यावर एकापाठोपाक बुक्के मारले.  

तुर्कीएच्या संसदेत झालेल्या मारहाणीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियालर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुर्कीएचे राष्ट्रपती रीसेप तैय्यप एर्दोगन यांनी अकिल गुरलेक यांना न्यायमंत्री म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र  विरोधी पक्षांचे नेते त्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यापासून रोखण्याच प्रयत्न करत होते. त्यामधूनच संसदेत वादावादी सुरू झाली होती. तसेच अखेर या वादावादीचं पर्यावसन धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले.

या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये संसदेत तुंबळ धक्काबुक्की होताना दिसत आहे. या मंत्र्यांच्या मदतीसाठी कुणी येऊ नये, यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांकडून त्यांवना घेराव घालण्यात आला होता. दरम्यान, या मारहाणीत कुणी जखमी झाल्याचं वृत्त नाही. तसेच या मारहाणीत सहभागी झालेल्या नेत्यांवर काही कारवाई झाल्याचेही समोर आलेले नाही.    

Web Title : तुर्की संसद में विपक्षी सांसदों ने मंत्री पर किया हमला, मचा हंगामा

Web Summary : तुर्की की संसद में विपक्षी सांसदों ने नए न्याय मंत्री पर हमला कर दिया, जिससे हंगामा मच गया। मंत्री के शपथ लेने से रोकने के प्रयास के दौरान यह घटना हुई और मारपीट में बदल गई। वीडियो में मंत्री घिरे हुए और पीटे जाते हुए दिखाई दे रहे हैं; हालांकि, किसी के घायल होने की खबर नहीं है।

Web Title : Opposition MPs Assault Minister in Parliament, Chaos Ensues in Turkey

Web Summary : A chaotic scene unfolded in Turkey's parliament as opposition MPs physically assaulted the newly appointed Justice Minister. The incident stemmed from opposition attempts to block the minister's oath, escalating into a brawl. Video footage shows the minister surrounded and struck, though no injuries were reported.