जपानच्या समुद्रात भीषण ज्वालामुखी उद्रेक; काही मिनिटांत नवीन बेटाची निर्मिती, पाहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 08:42 PM2023-11-07T20:42:31+5:302023-11-07T20:43:41+5:30

ज्वालामुखीमुळे बेट तयार झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Fierce Volcanic Eruption in the Sea of Japan; Creation of a new island in minutes, watch the video | जपानच्या समुद्रात भीषण ज्वालामुखी उद्रेक; काही मिनिटांत नवीन बेटाची निर्मिती, पाहा व्हिडिओ...

जपानच्या समुद्रात भीषण ज्वालामुखी उद्रेक; काही मिनिटांत नवीन बेटाची निर्मिती, पाहा व्हिडिओ...

Japan Volcano Eruption : पृथ्वीवर अनेक ठिकाणी ज्वालामुखी उद्रेकानंतर नवीन बेटांची निर्मिती झाली आहे. पण, तुम्ही कधी हे बेट तयार होताना पाहिले आहे का? सोशल मीडियावर एक व्हिडओ व्हायरल होत आहे, ज्यात ज्वालामुखी उद्रेकामुळे काही मिनिटांत नवीन बेट तयार झाल्याचे दिसत आहे. ही घटना जपानच्या समुद्रात घडली. 

जपानची राजधानी टोकियोच्या दक्षिणेस 1000 किमी अंतरावर असलेल्या प्रशांत महासागरात पाण्याखालील ज्वालामुखीचा उद्रेक झाला. उद्रेक एवढा भीषण होता की, त्यातून काही मिनिटांत नवीन बेट तयार झाले. या बेटाचा आकार किमान 200 मीटर लांब आहे. हे बेट इवोटो बेटाच्या किनाऱ्यापासून थोडे दूर आहे. पूर्व इवोटोला इवोजिमा म्हणतात. 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या ज्वालामुखी उद्रेकामुळे या बेटाची निर्मिती झाली. 

पाहा व्हिडिओ-

इवोटोवर सध्या जपानी नौदलाचा एअरबेस आहे. याचा दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. बेटावरील नौसैनिकांनी सांगितले की, त्यांना सुरुवातीला मोठा आवाज ऐकू आला, यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बेट तयार झाल्याचे पाहिले. जपानच्या हवामान खात्याने सांगितले की, 21 ऑक्टोबरपासून इवातो बेटाच्या आसपास सौम्य भूकंपही येत आहेत. पण पाण्याखालील ज्वालामुखीचा उद्रेक होईल, असे वाटले नव्हते.

जपानमध्ये अनेक ज्वालामुखी बेटे
यापूर्वीही जपानच्या आजूबाजूला काही बेटे निर्माण झाली होती, पण खराब हवामानामुळे ती गायब झाली. आता जिथे नवीन बेट तयार झाले आहे, तिथे 1986 मध्ये असेच बेट तयार झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत येथे एकही बेट तयार झाले नव्हते. आता हे बेट किती दिवस टिकणार, हे येणाऱ्या काळात कळेल.

जपानच्या आसपास 7000 नवीन बेटे 
या वर्षाच्या सुरुवातीलाच जपानच्या आजूबाजूच्या भागांचा अभ्यास करून नकाशा तयार करण्यात आला होता. ज्यामध्ये 7000 नवीन बेटांचा शोध लागला. अशा प्रकारचे सर्वेक्षण 35 वर्षात प्रथमच करण्यात आले. मात्र, या नवीन बेटाच्या निर्मितीमुळे जपानच्या सीमांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणने आहे.

Web Title: Fierce Volcanic Eruption in the Sea of Japan; Creation of a new island in minutes, watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.