८ दहशतवाद्यांच्या फाशीसाठी फतवा
By Admin | Updated: January 5, 2015 03:56 IST2015-01-05T03:31:21+5:302015-01-05T03:56:13+5:30
पाकिस्तानात दहशतवादविरोधी न्यायालयाने आणखी आठ दहशतवाद्यांच्या फाशीचा आदेश काढला आहे. पेशावर येथील शाळेतील हल्ल्यात १५० लोक ठार

८ दहशतवाद्यांच्या फाशीसाठी फतवा
इस्लामाबाद : पाकिस्तानात दहशतवादविरोधी न्यायालयाने आणखी आठ दहशतवाद्यांच्या फाशीचा आदेश काढला आहे. पेशावर येथील शाळेतील हल्ल्यात १५० लोक ठार झाल्यानंतर दहशतवाद्यांच्या फाशीवरील बंदी उठवण्यात आली आहे. त्यानंतर दहशतवाद्यांच्या फाशीचे आदेश निघत आहेत. आतापर्यंत सात दहशतवाद्यांना फाशी झाली आहे, हा फाशीच्या शिक्षेचा दुसरा फे र आहे.
या आठ दहशतवाद्यांत लष्कर ए झांगवी या संघटनेचे चारजण असून त्यात मोहम्मद शहीद हनीफ , मोहम्मद तल्हा हुसेन, खलिल अहमद व मोहम्मद सईद हे आहेत त्यांच्यावर जातीयवादी हिंसाचार केल्याचा आरोप आहे. हनीफ, हुसेन मोहम्मद यांना एप्रिल २००२ मध्ये फाशीची शिक्षा झाली होती.
सईदवर निवृत्त पोलिस अधीक्षकाची हत्या केल्याचा आरोप होता. पाचवा आरोपी शफाकत हुसेन आहे. बहराम खानसह चौघांना १३ जानेवारी रोजी, तर शफाकत हुसेनसह तिघांना १४ जानेवारीला फाशी होणार आहे. तल्हा हुसेन व सईद अशा दोघांना १५ जानेवारीला फाशी दिली जाईल. (वृत्तसंस्था)