इथिओपियामध्ये भीषण अपघात, ट्रक नदीत पडला; ६० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:36 IST2024-12-30T12:35:38+5:302024-12-30T12:36:14+5:30

आफ्रिकन देश इथियोपियामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत पडला. या अपघातात ६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Fatal accident in Ethiopia, truck falls into river; 60 people die | इथिओपियामध्ये भीषण अपघात, ट्रक नदीत पडला; ६० जणांचा मृत्यू

इथिओपियामध्ये भीषण अपघात, ट्रक नदीत पडला; ६० जणांचा मृत्यू

आफ्रिकन देश इथियोपियामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत पडला. या अपघातात ६० जणांचा मृत्यू झाला. दक्षिणी सिदामा क्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात बोना जिल्ह्यात घडला. अपघातात जखमी झालेल्यांवर बोना जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सरकारी मालकीच्या इथियोपियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, सर्व लोक एका लग्न समारंभात सहभागी होणार होते. इथिओपियामध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खराब ड्रायव्हिंग, जीर्ण वाहने सुरक्षित वाहतुकीसाठी सर्वात मोठा अडथळा आहेत.

सर्व लोक इसुझू ट्रकमधून प्रवास करत होते. मात्र अचानक ट्रक रस्ता चुकला आणि नदीत पडला. या नदीत अजूनही शोध मोहिम सुरूच आहे. स्थानिक लोक आणि सरकारी विभाग मदत आणि बचाव कार्य करत आहेत.

सहा वर्षांपूर्वी २०१८ मध्ये इथिओपियामध्ये एक मोठी दुर्घटना घडली होती. या अपघातात विद्यार्थ्यांनी भरलेली बस खड्ड्यात पडली, यात ३८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

Web Title: Fatal accident in Ethiopia, truck falls into river; 60 people die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात