Aamir Liaquat- Dania Shah Divorce: पाकिस्तानच्या फेमस खासदाराचे लग्न मोडले; ३१ वर्षे लहान पत्नीने लावले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 08:27 IST2022-05-09T08:20:44+5:302022-05-09T08:27:44+5:30
News about Syeda Dania Shah, Aamir Liaquat divorce: फेब्रुवारीमध्येच या दोघांचे लग्न झाले होते. ४९ वर्षीय खासदाराचा १८ वर्षीय सईदा दानिया शाहसोबत तिसरा विवाह झाला. याच दिवशी आमिर यांच्या दुसऱ्या पत्नीने त्यांना तलाक दिला होता.

Aamir Liaquat- Dania Shah Divorce: पाकिस्तानच्या फेमस खासदाराचे लग्न मोडले; ३१ वर्षे लहान पत्नीने लावले गंभीर आरोप
आधीच्या पत्नीपासून घटस्फोट मिळाल्याच्याच दिवशी दुसरे लग्न ते देखील ३१ वर्षे लहान तरुणीशी करणारा पाकिस्तानी खासदार डॉ. आमिर लियाकत हुसैन याला मोठा धक्का बसला आहे. या १८ वर्षीय पत्नीने चार महिन्यांतच लियाकतवर गंभीर आरोप केला आहे.
फेब्रुवारीमध्येच या दोघांचे लग्न झाले होते. ४९ वर्षीय खासदाराचा १८ वर्षीय सईदा दानिया शाहसोबत तिसरा विवाह झाला. याच दिवशी आमिर यांच्या दुसऱ्या पत्नीने त्यांना तलाक दिला होता. गेल्या १४ महिन्यांपासून आपण वेगळे राहत असल्याचंही तिनं म्हटलं होतं. आता हे जगभरात चर्चिले गेलेले लग्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
सईदा दानिया शाह हिने आता लोकप्रिय टेलिव्हिजन होस्ट डॉ. आमिर लियाकत हुसैन यांच्याशी तलाक मागितला आहे. यासाठी तिने अर्ज दाखल केला आहे. यामध्ये ती म्हणते की, आमिर टीव्हीवर जसे दिसतात, तसे अजिबात नाहीत आणि शैतानापेक्षाही खूप वाईट आहेत. आमिरसोबतच्या लग्नाला चार महिने उलटले आहेत आणि या चार महिन्यांत वेदनांशिवाय काहीही मिळालेले नाही. एका छोट्या खोलीत ठेवले जायचे. दारूच्या नशेत तो मला मारहाण करत असे. मला आणि माझ्या कुटुंबाला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देत आहे, असे गंभीर आरोप तिने केले आहेत.
घटस्फोटाशिवाय दानियाने फॅमिली कोर्टात आणखी केसेस दाखल केल्या आहेत. मेहर, घर आणि दागिने, 115 दशलक्ष पाकिस्तानी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही सईदाने केली आहे. तिच्या अर्जावर ७ जून रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.