अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर सर्वात मोठी कारवाई; Facebook च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 07:45 IST2021-06-05T07:43:15+5:302021-06-05T07:45:57+5:30
Suspended former United States President Donald Trump's FB account for two years: ट्रम्प यांच्या अकाऊंटरवर २ वर्षाची बंदी घातली आहे. ७ जानेवारी २०२१ पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर सर्वात मोठी कारवाई; Facebook च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं
अमेरिकेच्या संसदेत दंगल भडकवण्याच्या आरोपाखाली फेसबुकनं माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Former US President Donald Trump) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. फेसबुक(Facebook)नं ट्रम्प यांचे अकाऊंट कमीत कमी २०२३ पर्यंत सस्पेंड केले आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी फेसबुकनं US Capitol घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट सस्पेंड करण्याचा निर्णय घेतला होता. एखाद्या राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांचे अकाऊंटवर बंदी आणण्याची ही पहिलीच घटना आहे.
ट्रम्प यांच्या अकाऊंटरवर २ वर्षाची बंदी घातली आहे. ७ जानेवारी २०२१ पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल. जेव्हा फेसबुकनं पहिल्यांदा ही बंदी घातली होती. फेसबुकच्या इतिहासात इतकी मोठी कारवाई होण्याची ही पहिली वेळ आहे. त्यानंतर काही आठवड्यात कंपनीने या निर्णयाला ओवरसाइट बोर्डला ट्रान्सफर केले. कंपनीनचे म्हणणं आहे की, ज्यावेळी संसद परिसरात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ट्रम्प यांनी “We love You, You are very Special” अशी पोस्ट केली होती. या हिंसक घटनेत सहभागी असणाऱ्यांना देशभक्त म्हणणं आणि या दिवसाची इतिहासात नोंद ठेवली जाईल असं म्हणणं फेसबुकच्या नियमांचा भंग करणे होतं.
आमच्या सुविधेचा वापर करून देणं हा सर्वात मोठा धोका
फेसुबकच्या निरीक्षण बोर्डाने मागील महिन्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंट घातलेली बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. कंपनी ट्रम्प यांच्यावर दंड लावण्यास अपयशी ठरली. ट्रम्प यांचे अकाऊंट बंद करतेवेळी फेसबुकचे मुख्य मार्क जुकरबर्ग यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं की, या काळात माजी राष्ट्राध्यक्षांना आमच्या सेवेचा वापर सुरू ठेवण्याची परवानगी देणं सर्वात मोठा धोका आहे असं सांगितले होते.
बोर्डाने ६ महिन्याचा दिला होता कालावधी
कंपनीने हे प्रकरण अलीकडेच निरीक्षण बोर्डाकडे सोपवलं होतं. या बोर्डात वकील, मानवाधिकार कार्यकर्ते आणि अकैडमिक्स यांचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर लावण्यात आलेली बंदी हटवावी की कायम ठेवावी याबाबत बोर्डाला निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यावेळी बोर्डाने अनिश्चित काळासाठी अकाऊंट बॅन करणं आणि दंड लावणं योग्य राहणार नाही असं सांगितले. तसेच बोर्डाने फेसबुकच्या मनमानी दंडाविरोधात चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर कंपनीने २ वर्षासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक खाते २ वर्षासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.