फेसबुक डेटा लीक : 2.9 कोटी युजर्सची माहिती चोरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 23:45 IST2018-10-12T23:44:11+5:302018-10-12T23:45:03+5:30
गेल्या महिन्यात फेसबुकच्या वेबसाईटवरील एका फिचरमधील कमतरतेमुळे हॅकर्सनी डेटा चोरल्याची बाब समोर आली होती.

फेसबुक डेटा लीक : 2.9 कोटी युजर्सची माहिती चोरली
काही दिवसांपूर्वीच तब्बल 5 कोटी युजर्सची माहिती चोरीला गेल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला होता. मात्र, यापैकी तीन कोटीच युजर्सची माहिती चोरीला गेल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.
गेल्या महिन्यात फेसबुकच्या वेबसाईटवरील एका फिचरमधील कमतरतेमुळे हॅकर्सनी डेटा चोरल्याची बाब समोर आली होती. यानंतर आठवडाभराने फेसबुकने त्यावर उपाय योजल्यानंतर 5 कोटी युजर्सचा डेटा चोरीला गेल्याचे स्पष्ट केले होते. तसेच जगभरातील 9 कोटी युजर्सना तातडीने अकाऊंट लॉगआऊट करण्यास भाग पाडले होते. मात्र, आता यापैकी 2.9 कोटी युजर्सच्या डेटाची माहिती चोरीला गेल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
BREAKING Facebook says hackers accessed data of 29 million users pic.twitter.com/OESaFjYcIT
— AFP news agency (@AFP) October 12, 2018
फेसबुकच्या उपाध्यक्षांनी चौकशी समितीला दिलेल्या माहितीनुसार, 1.5 कोटी युजर्सचे नाव आणि त्यांचे फोन नंबर, पत्ता चोरला आहे. तर 1.4 कोटी युजर्सचा नाव, फेन नंबरसह युजरनेम, जेंडर, भाषा, रिलेशनशिप, धर्म, जन्मदिवस, शिक्षण आदीशी संबंधित माहिती तसेच शेवटच्या 10 ठिकाणांना भेट दिलेली माहिती चोरण्यात आली आहे.