बॉम्बच्या अफवेने फेसबुकच्या ऑफिसमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 16:24 IST2018-12-13T16:23:25+5:302018-12-13T16:24:21+5:30
सोशल नेटवर्किंगमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकच्या ऑफिसमध्ये अज्ञात व्यक्तीने दिलेल्या बॉम्बच्या धमकीमुळे एकच गेल्या मंगळवारी एकच खळबळ उडाली.

बॉम्बच्या अफवेने फेसबुकच्या ऑफिसमध्ये खळबळ
कॅलिफोर्निया : सोशल नेटवर्किंगमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकच्या ऑफिसमध्ये अज्ञात व्यक्तीने दिलेल्या बॉम्बच्या धमकीमुळे एकच गेल्या मंगळवारी एकच खळबळ उडाली. कॅलिफोर्नियामधीलफेसबुकच्या ऑफिसमध्ये बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर काही मिनिटांत इमारत खाली करण्यात आली.
एपी या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकच्या ऑफिसमधीस बॉम्ब संबधिची माहिती मिळताच मेंलो पार्कमधील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक, नाशक पथकाद्वारे संपूर्ण इमारतीची तपासणी करण्यात आली. मात्र, या ठिकाणी कोणतीही संशयित वस्तू सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या बॉम्बच्या अफवेमुळे फेसबुक ऑफिसच्या बाजूला असलेल्या इतर इमारती सुद्धा खाली करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमधील सीएनएसच्या ऑफिसध्ये बॉम्ब असल्याची अफवा समोर आली होती. सीएनएनच्या ऑफिसमध्ये जवळपास पाच बॉम्ब ठेवण्यात आले आहेत, असा फोन येथील पोलीस विभागाला आला होता. यामुळे परिसरात खळबळ माजली होती.