शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 05:37 IST

नवी दिल्ली : प्रचंड उष्म्याच्या संपर्कात येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात दीड वर्षांपर्यंत घट होऊ शकते. कारण हवामान बदलाचा शिक्षणावर ...

नवी दिल्ली : प्रचंड उष्म्याच्या संपर्कात येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात दीड वर्षांपर्यंत घट होऊ शकते. कारण हवामान बदलाचा शिक्षणावर थेट परिणाम होत आहे व पुढील दशकांमध्येही याचा प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे एका जागतिक अहवालात म्हटले आहे.

तापमान, वणवा, पूर, वादळ, दुष्काळ, आजार आणि समुद्राची वाढती पातळी हे घटक शिक्षणावर परिणाम करीत आहेत. अहवालात म्हटले आहे की, बहुतांश निम्न व मध्यम उत्पन्न असणारे देश दरवर्षी हवामान बदलांमुळे तणावांना सामोरे जात आहेत. यामुळे शिक्षणाचे नुकसान व विद्यार्थीशाळा सोडण्याच्या शक्यता वाढत आहेत.  युनेस्को व कॅनडातील सस्केचवान विद्यापीठाद्वारे संकलित माहितीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

अहवालातील धक्कादायक निष्कर्ष  प्रचंड उष्म्याच्या संपर्कात आल्यामुळे मुलांच्या शैक्षणिक जीवनाची हानी झाली. १९६९ ते २०१२च्या दरम्यान २९ देशांतील जनगणना व जलवायूसंबंधी आकडेवारीचा संबंध जोडला असता, गर्भात राहिल्यापासून ते प्रारंभिक जीवनकाळात सरासरीपेक्षा अधिक तापमानाच्या संपर्कात आल्याचा संबंध विशेष रूपाने आग्नेय आशियामध्ये शालेय शिक्षणाच्या वर्षांमध्ये घट पाहावयास मिळते.सरासरी दोन अंश अधिक तापमानाचा सामना करणाऱ्या बालकांना १.५ वर्ष शालेय शिक्षण कमी मिळेल. मागील २० वर्षांतील नैसर्गिक घटनांमुळे किमान ७५ टक्के वेळा शाळा बंद आहेत. यामुळे ५० लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत.

उच्च तापमानामुळे चीनमध्ये उच्चस्तरीय परीक्षेत विद्यार्थ्यांच्या निकालावर प्रतिकूल परिणाम पडत आहे. हायस्कूल व कॉलेज, पदवीचे प्रवेश कमी झाले आहेत. जकार्तामध्ये २०१३च्या पुरानंतर शाळांमधील प्रवेश विस्कळीत झाला होता. २०१९मध्ये नैसर्गिक घटनांमुळे सर्वांत जास्त प्रभावित होणाऱ्या १० देशांमध्ये ८ निम्न-मध्यम उत्पन्न असणारे देश आहेत.

टॅग्स :weatherहवामान अंदाजHeat Strokeउष्माघातSchoolशाळाStudentविद्यार्थी