झेक प्रजासत्ताक देशातील दक्षिण बोहेमियन परिसरात गुरुवारी दोन रेल्वेगाड्यांची भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला. या आपघातात ४० हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. जखमींपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सीटीके या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार हा अपघात सकाळी ६.२० च्या सुमारास सेस्के बुदेजोविस शहराजवळ झाला. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या आपघातानंतर सेस्के बुदेजोविस आणि प्लजेन शहरादरम्यान, वाहतूक थांबवण्यात आली होती. तर अधिकाऱ्यांकडून अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.हा अपघात प्रागपासून सुमारे १३२ किमी दक्षिणेस असलेल्या एका ठिकाणी झाला. अपघातानंतर सर्व प्रवाशांना दोन्ही ट्रेनममधून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.वाहतूकमंत्री मार्टिन कुप्का यांनी सांगितले की, आज सकाळी ज्लिव आणि दिवची दरम्यान, एक एक्स्प्रेस ट्रेन आणि एका पॅसेंजरमध्ये समोरासमोर धडक झाली. आपाकालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या असून, ट्रेनमधून जखमी प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. दरम्यान, अपघाताच्या कारणांचा शोध सुरू आहे.
Web Summary : A major train accident occurred in the Czech Republic's South Bohemian region, injuring over 40 people. An express train collided head-on with a passenger train near Ceske Budejovice. Rescue operations are underway, and the cause of the crash is under investigation. Several passengers are seriously injured.
Web Summary : चेक गणराज्य के दक्षिण बोहेमियन क्षेत्र में एक बड़ा ट्रेन हादसा हुआ, जिसमें 40 से अधिक लोग घायल हो गए। सेस्के बुडेजोविस के पास एक एक्सप्रेस ट्रेन और एक पैसेंजर ट्रेन की आमने-सामने टक्कर हो गई। बचाव कार्य जारी है, और दुर्घटना के कारणों की जांच की जा रही है। कई यात्री गंभीर रूप से घायल हैं।