युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:24 IST2025-09-01T16:24:28+5:302025-09-01T16:24:41+5:30
युरोपियन युनियनच्या नेत्यांचे विमान बल्गेरियावरून जात होते. तेव्हा या विमानाचे अचानक रडार जाम करण्यात आले.

युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान आता रशियावर युरोपियन युनियन (EU)ने गंभीर आरोप केले आहेत. आमच्या नेत्यांच्या विमानाचे रडार जाम केल्याचा दावा करण्यात आला आहे.
युरोपियन युनियनच्या नेत्यांचे विमान बल्गेरियावरून जात होते. तेव्हा या विमानाचे अचानक रडार जाम करण्यात आले. युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्याने हे रशियाने केले असल्याचा दावा केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन या त्या विमानातून जात होत्या. बल्गेरियावर लेयन यांचे विमान आले असता त्यांच्या विमानावर हल्ला करण्यात आला. विमानाचे रडार जाम करण्यात आले. बेलारूसच्या सीमेवर असलेल्या युरोपियन युनियनच्या राष्ट्रांच्या नियोजित दौऱ्यासाठी त्या जात होत्या. रडार जाम केले तरी देखील पायलटने प्लोवडिव्ह विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरविले, असे युरोपच्या अधिकाऱ्याने सांगितले.