एपस्टीनच्या आलिशान ‘झोरो रॅंँच’ची पुन्हा चौकशी; लैंगिक शोषणप्रकरणी न्याय विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 08:59 IST2026-02-21T08:58:48+5:302026-02-21T08:59:32+5:30

न्यू मेक्सिकोमधील हे मूळ प्रकरण २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या फेडरल प्रोसिक्युटर्सच्या विनंतीवरून बंद करण्यात आले होते. मात्र, आता समोर आलेल्या आणि गोपनीय  एफबीआय फाइल्समधील धक्कादायक माहितीमुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Epstein's luxurious 'Zorro Ranch' re-investigated; Justice Department's decision in sexual abuse case | एपस्टीनच्या आलिशान ‘झोरो रॅंँच’ची पुन्हा चौकशी; लैंगिक शोषणप्रकरणी न्याय विभागाचा निर्णय

एपस्टीनच्या आलिशान ‘झोरो रॅंँच’ची पुन्हा चौकशी; लैंगिक शोषणप्रकरणी न्याय विभागाचा निर्णय

अल्बुकर्की : लैंगिक शोषण प्रकरणातील दोषी एपस्टीनच्या मालकीच्या ‘झोरो रँच’वरील बेकायदा कृत्यांची चौकशी पुन्हा सुरू केली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने हा निर्णय घेतला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

न्यू मेक्सिकोमधील हे मूळ प्रकरण २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या फेडरल प्रोसिक्युटर्सच्या विनंतीवरून बंद करण्यात आले होते. मात्र, आता समोर आलेल्या आणि गोपनीय  एफबीआय फाइल्समधील धक्कादायक माहितीमुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चौकशीतून न्यू मेक्सिकोचा न्याय विभाग आता मूळ फेडरल फाइल्स मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या चौकशीत नवी ‘सत्यशोधन समिती’ आणि इतर कायदे अंमलबजावणी संस्था या रँचवर नक्की काय घडले, याचा तपास करतील.

काय आहे ‘झोरो रँच’?

झोरो रँच हे अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यातील सांता फे स्थित १०,००० एकरचे विस्तीर्ण क्षेत्र आहे. एपस्टीन याने १९९३ मध्ये हे रँच विकत घेत तेथे एक भव्य बंगला, खाजगी विमानतळ आणि हेलिपॅड बांधले होते. या जागेचा वापर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीसाठी केल्याचा आरोप आहे.  आता तिथे ख्रिश्चन आध्यात्मिक केंद्र चालवले जाणार आहे.

Web Title : एपस्टीन के 'ज़ोरो रेंच' की फिर से जांच; यौन शोषण पर न्याय विभाग का फैसला

Web Summary : एपस्टीन के 'ज़ोरो रेंच' पर अवैध गतिविधियों की फिर से जांच शुरू। न्याय विभाग ने एफबीआई फाइलों में चौंकाने वाले खुलासे के बाद मामला फिर से खोला। यौन शोषण और तस्करी के लिए कथित तौर पर इस्तेमाल किए गए रेंच की जांच एक नया सत्य आयोग करेगा। यह न्यू मेक्सिको में स्थित है।

Web Title : Epstein's 'Zorro Ranch' Re-investigated; Justice Department Acts on Sex Abuse

Web Summary : Epstein's 'Zorro Ranch' is under renewed investigation for illegal activities. The Justice Department reopened the case after shocking FBI file revelations. The ranch, allegedly used for sexual abuse and trafficking, will be investigated by a new truth commission. It is located in New Mexico.