कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित प्रकरणाने पुन्हा एकदा जगाला हादरवून सोडले आहे. एपस्टीनच्या मृत्यूनंतर जप्त करण्यात आलेल्या हार्ड डिस्क आणि गुप्त कागदपत्रांमधून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांच्या आणि उद्योगपतींच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन तपास यंत्रणांनी एपस्टीनच्या मालमत्तेतून जप्त केलेल्या हार्ड डिस्कमध्ये अनेक 'हाय-प्रोफाईल' भेटीगाठींचे तपशील आहेत. या कागदपत्रांमध्ये अशा लोकांची नावे आणि फोटो असल्याचा दावा केला जात आहे, ज्यांनी एपस्टीनच्या खाजगी बेटाला किंवा त्याच्या विमानाला भेट दिली होती.
पुराव्यांचा महासागर: ३० लाख पाने आणि २००० व्हिडिओया ताज्या खुलाशात ३० लाख पानांचे लिखित रेकॉर्ड्स, २,००० पेक्षा जास्त व्हिडिओ आणि सुमारे २ लाख फोटोंचा समावेश आहे. एपस्टीनने जगभरातील 'प्रतिष्ठित' लोकांना आपल्या जाळ्यात कसे ओढले होते आणि त्यांचे नेटवर्क किती खोलवर पसरले होते, याचा उलगडा या कागदपत्रांमधून होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि इवांका ट्रम्प: या फाइल्समध्ये केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच नाहीत, तर त्यांची मुलगी इवांका ट्रम्प हिचेही नाव आहे. एका ईमेलच्या विषयामध्ये इवांका आणि तिचे पती जॅरेड कुशनर यांचा उल्लेख आहे. ट्रम्प एका व्हिडिओमध्ये बोलताना दिसत असले, तरी अधिकाऱ्यांनी त्यांना तपासापासून संरक्षण देण्यास नकार दिला आहे.
एलॉन मस्क: टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क हे एपस्टीनशी व्यवसायानिमित्त चर्चा करताना आढळले आहेत. मस्क यांनी एपस्टीनच्या पार्ट्यांना जाण्यास इन्कार केला होता.
प्रिंस अँड्र्यू: एपस्टीन नजरकैदेत असतानाही प्रिन्स अँड्र्यू त्याच्या संपर्कात होते, असे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे.
रिचर्ड ब्रॅन्सन: उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन हे एपस्टीनची प्रतिमा सुधारण्यासाठी लॉबिंग करत असल्याचे काही व्यवहारांवरून दिसून आले आहे.
इतर सेलिब्रिटी: या फाइल्समध्ये हॉलिवूड दिग्दर्शक वुडी ॲलन, गायक डायना रॉस, अभिनेता केविन स्पेसी आणि ब्रिटनचे माजी राजदूत पीटर मँडेलसन यांचीही नावे आहेत.
Web Summary : Jeffrey Epstein's files reveal alleged connections to prominent figures like Elon Musk and Donald Trump. Documents include names, photos from Epstein's island, and details of high-profile meetings, sparking global controversy.
Web Summary : जेफ्री एपस्टीन की फाइलों में एलन मस्क और डोनाल्ड ट्रम्प जैसे प्रमुख व्यक्तियों से कथित संबंध सामने आए। दस्तावेजों में एपस्टीन के द्वीप से नाम, तस्वीरें और हाई-प्रोफाइल बैठकों का विवरण शामिल है, जिससे वैश्विक विवाद पैदा हो गया है।