एपस्टीन फाइल्समुळे जगभर राजकीय गोंधळ, ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू माऊंटबॅटन-विंडसर गोत्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:44 IST2026-02-02T13:43:46+5:302026-02-02T13:44:45+5:30

अमेरिकी सरकारने जाहीर केलेल्या कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांच्याशी संबंधित फाइल्समुळे जगभर राजकीय गोंधळ उडाला आहे. 

Epstein files cause political turmoil worldwide, former British Prince Andrew Mountbatten-Windsor in trouble | एपस्टीन फाइल्समुळे जगभर राजकीय गोंधळ, ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू माऊंटबॅटन-विंडसर गोत्यात

एपस्टीन फाइल्समुळे जगभर राजकीय गोंधळ, ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू माऊंटबॅटन-विंडसर गोत्यात

न्यूयॉर्क: अमेरिकी सरकारने जाहीर केलेल्या कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांच्याशी संबंधित फाइल्समुळे जगभर राजकीय गोंधळ उडाला आहे. यात नाव आल्यामुळे स्लोव्हाकियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राजीनामा दिला असून दुसरीकडे ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू माऊंटबॅटन-विंडसर यांच्यावरही अमेरिकी चौकशी पथकासमोर साक्ष देण्यासाठी दबाव वाढला आहे.

स्लोव्हाकियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेचे माजी अध्यक्ष मिरोस्लाव लाजकाक यांना या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला असून पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी तो स्वीकारला आहे. लाजकाक यांच्यावर फार गंभीर आरोप नव्हते तरीही एपस्टीनसोबत त्यांच्या भेटीचा फोटो व ई-मेल समोर आल्याने त्यांनी राजीनामा दिला.

प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर अमेरिकेचा दबाव

ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू एपस्टीनचे दीर्घकाळ मित्र होते. त्यांनी अमेरिकी तपाससंस्थांशी सहकार्य करावे म्हणून दबाव वाढला असून ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी प्रिन्स अँड्र्यू यांनी एपस्टीनच्या कारवायांबद्दल त्यांच्याकडील माहिती अधिकाऱ्यांसमोर उघड करावी, असे आवाहन केले आहे. 

ट्रम्प यांचे हजारो संदर्भ

अमेरिकेत जाहीर झालेल्या या फाइल्समध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हजारो संदर्भ आले आहेत. शिवाय, एपस्टीनचे प्रिन्स अँड्र्यू यांच्याशी असलेल्या मैत्रीशी संबंधित कागदपत्रे, ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन, न्यूयॉर्क जायंट्सचे सह-मालक स्टीव्ह टिश, अब्जाधीश बिल गेट्स आणि इलॉन मस्क यांच्याशी संबंधित ई-मेल समाविष्ट आहेत.

एहुल बराक ते सर्गेई ब्रिन 

इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद बराक व त्यांची पत्नी, ट्रम्प यांचे वाणिज्य सचिव लुटनिक, गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन यांचीही कागदपत्रांत नावे आहेत.  अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी एफबीआयने २००६मध्ये एपस्टीनची चौकशी सुरू केली. २०१९ मध्ये आरोप निश्चित झाल्यानंतर न्यूयॉर्क तुरुंगात तो मृतावस्थेत आढळला.

Web Title : एपस्टीन फाइल्स से विश्व में राजनीतिक उथल-पुथल; प्रिंस एंड्रयू मुश्किल में

Web Summary : एपस्टीन फाइलों से वैश्विक अराजकता। स्लोवाक अधिकारी का इस्तीफा। प्रिंस एंड्रयू पर गवाही का दबाव। ट्रम्प का नाम बार-बार आया। दस्तावेजों में एहुद बराक और सर्गेई ब्रिन सहित विभिन्न हस्तियों के नाम एपस्टीन से जुड़े हैं। 2019 में जेल में उसकी मौत हो गई।

Web Title : Epstein Files Trigger Global Political Turmoil; Prince Andrew in Trouble

Web Summary : Epstein files spark global chaos. A Slovak official resigned. Prince Andrew faces pressure for testimony. Trump's name appears frequently. Documents link various figures, including Ehud Barak and Sergei Brin, to Epstein. He died in jail in 2019.