शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एपस्टीन फाईल्सचं 'अरब' कनेक्शन! ४६९ ईमेल आणि एका बड्या महिला अधिकाऱ्याचं नाव; काय आहे सत्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:26 IST

अमेरिकेच्या न्याय विभागाने सार्वजनिक केलेल्या ताज्या 'एपस्टीन फाईल्स'मध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी हिंद अल-ओवैस यांचे नाव तब्बल ४६९ वेळा समोर आले आहे.

जगप्रसिद्ध आणि वादग्रस्त जेफ्री एपस्टीन प्रकरणाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने सार्वजनिक केलेल्या ताज्या 'एपस्टीन फाईल्स'मध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी हिंद अल-ओवैस यांचे नाव तब्बल ४६९ वेळा समोर आले आहे. या खुलाशामुळे जागतिक स्तरावर उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा एपस्टीनशी नेमका काय संबंध होता, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कोण आहेत हिंद अल-ओवैस?

हिंद अल-ओवैस या संयुक्त अरब अमिरातीच्या राजनैतिक वर्तुळातील एक अत्यंत वजनदार नाव आहे. सध्या त्या देशाच्या मानवाधिकार स्थायी समितीच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. संयुक्त राष्ट्रांमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करणाऱ्या पहिल्या अमिराती महिलांमध्ये त्यांचा समावेश होतो. महिला सक्षमीकरण, लैंगिक समानता आणि मानवाधिकारांच्या विषयावर त्या जागतिक व्यासपीठावर हिरीरीने बोलण्यासाठी ओळखल्या जातात.

ईमेलमधील 'ते' संदेश संशयाच्या भोवऱ्यात?

२०११ आणि २०१२ दरम्यानचे हे ईमेल असल्याचे सांगितले जात आहे. या फाईल्समध्ये केवळ नावच नाही, तर काही संवादही समोर आले आहेत. एका ईमेलमध्ये त्यांनी कथितपणे म्हटले आहे की, "एका मुलीला तयार करणे कठीण असते, दोन मुलींना सांभाळणे हे तर आव्हानच आहे." तसेच दुसऱ्या एका संदेशात त्यांनी आपल्या लहान बहिणीची भेट करून देण्याबाबत उत्सुकता व्यक्त केल्याचेही समोर आले आहे. या संदिग्ध संवादामुळे सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत, मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

गुन्हा की केवळ संपर्क?

महत्त्वाची बाब म्हणजे, या फाईल्समध्ये नाव आले असले तरी हिंद अल-ओवैस यांच्यावर कोणताही अधिकृत गुन्हेगारी आरोप ठेवण्यात आलेला नाही. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, सार्वजनिक करण्यात आलेली कागदपत्रे हा प्राथमिक पुरावा असू शकतो, पण केवळ नाव असणे म्हणजे गुन्हा सिद्ध होणे नव्हे. त्या जेफ्री एपस्टीनच्या बेकायदेशीर कामांमध्ये सामील होत्या की नाही, याचे ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत.

युएई सरकार आणि ओवैस यांची चुप्पी

या प्रकरणावर आतापर्यंत हिंद अल-ओवैस किंवा संयुक्त अरब अमिराती सरकारने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकी चर्चा होऊनही त्या आजही आपल्या पदावर कायम आहेत. दुसरीकडे, नागरी हक्क संघटनांनी इशारा दिला आहे की, पूर्ण चौकशी झाल्याशिवाय कोणाच्याही चारित्र्यावर संशय घेणे चुकीचे ठरू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Epstein Files: UAE official's name surfaces, raising questions and concerns.

Web Summary : The Epstein files reveal UAE's Hind Al-Owais's name 469 times, sparking controversy. Emails raise suspicions, but no charges filed. UAE government silent.
टॅग्स :AmericaअमेरिकाUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती