पत्नीने घटस्फोट देण्यास दिला नकार, गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डच्या पत्नीसोबत केलं धक्कादायक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 14:59 IST2021-12-25T14:58:51+5:302021-12-25T14:59:03+5:30

एका व्यक्तीचं बाहेर अफेअर सुरू होतं, पण जेव्हा त्याने पत्नीला घटस्फोट मागितला तर तिने नकार दिला. याचा या व्यक्तीच्या गर्लफ्रेन्डला राग आला आणि....

England : Women did a very bad thing to boyfriend's wife, becoz she was not giving divorce to him | पत्नीने घटस्फोट देण्यास दिला नकार, गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डच्या पत्नीसोबत केलं धक्कादायक कृत्य

पत्नीने घटस्फोट देण्यास दिला नकार, गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डच्या पत्नीसोबत केलं धक्कादायक कृत्य

विवाहित पुरूष अनेकदा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतात. पण त्यानंतर परिवारात शांतता राहता नाही. पती-पत्नीत तर भांडण होतातच, सोबतच बाहेरचे लोकही खाजगी गोष्टींमध्ये लुडबूड करू लागतात. अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचं बाहेर अफेअर सुरू होतं, पण जेव्हा त्याने पत्नीला घटस्फोट मागितला तर तिने नकार दिला. याचा या व्यक्तीच्या गर्लफ्रेन्डला राग आला आणि ती असं कृत्य करून बसली ज्याबाबत वाचून अंगावर काटे येतील.

गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डच्या पत्नीच्या घराला लावली आग

'द सन' च्या रिपोर्टनुसार, इंग्लंडच्या (England) नॉर्थ शील्डमध्ये एका महिलेने आपल्या बॉयफ्रेन्डच्या पत्नीच्या घरी जाऊ आग लावली. बॉयफ्रेन्डची पत्नी घटस्फोट देण्यास नकार देत होती. ज्यामुळे तिनं असं केलं. मीडिया रिपोर्टनुसार, २३ वर्षीय क्लो शोटनच्या या कृत्याचा भांडाफोड सीसीटीव्ही फुटेजमधून झाला. ही घटना ३१ जुलैची आहे.

घरात महिला आणि तिचा मुलगा होता

जेव्हा व्यक्तीची गर्लफ्रेन्ड क्लो शोटनने लीन स्टिलडॉल्फच्या घरी आग लावली तेव्हा घरात तिच्यासोबत तिचा १७ वर्षांचा मुलगाही होता. महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. न्यूकॅसल क्राउन कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली. ज्यात प्रोसीक्यूटरने सांगितलं की, सकाळी साधारण ५ वाजता लीनला फायर अलार्म वाजण्याचा आवाज ऐकू आला. ज्यानंतर फायर ब्रिगेडला फोन करून बोलवण्यात आलं. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.

सीसीटीव्हीमुळे झाला भांडाफोड

त्यानंतर आग कशी लागली हे बघण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं गेलं. तेव्हा दिसलं की, क्लो शोटनने रात्री येऊन लायटर आणि एका कागदाच्या मदतीने घरात आग लावली होती. कोर्टाने याप्रकरणी क्लो शोटनला साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. लीनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पीडित लीन ने दिलेल्या माहितीनुसार, क्लो तिच्या पतीची गर्लफ्रेन्ड आहे. लीनने सांगितलं की, क्लो ने आग लावली कारण ती घटस्फोट देण्यास नकार देत होती. 
 

Web Title: England : Women did a very bad thing to boyfriend's wife, becoz she was not giving divorce to him