३० पेक्षा जास्त वय होऊनही गादी करत होती ओली, चेकअप केल्यावर बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 03:17 PM2022-01-17T15:17:30+5:302022-01-17T15:22:57+5:30

गादीवर लघवी करण्याच्या हा आजार काळानुसार वाढू लागल्याने एना फार चिंतेत होती. झोपताना ती डायपर घालून झोपत होती. यानंतर तिने ठरवलं की, ती आता डॉक्टरांकडे जाईल.

England : 33 year old woman urinate on the bed know cervical cancer treatment story | ३० पेक्षा जास्त वय होऊनही गादी करत होती ओली, चेकअप केल्यावर बसला धक्का

३० पेक्षा जास्त वय होऊनही गादी करत होती ओली, चेकअप केल्यावर बसला धक्का

Next

इंग्लंडमधील (England) एक महिला ३३ वर्षांची झाली तरी बिछाना ओला करत होती. हे वाचल्यावर कुणीही हैराण होईल. नॉविकमध्ये राहणारी ही एना वेकफील्ड नावाच्या महिलेने दहा वर्षांपर्यंत या आजाराचा सामना केला. २०१२ मध्ये जेव्हा एना १३५ किलोमीटर चॅरिटी वॉकवर गेली होती, तेव्हा ती टेंटमध्ये राहत होती आणि सकाळी उठून बघितलं तर तिचे कपडे भिजलेले राहत होते. त्यावेळी तिला वाटलं की, हे केवळ थकव्यामुळे झालं असेल.

डायपर लावून झोपत होती

गादीवर लघवी करण्याच्या हा आजार काळानुसार वाढू लागल्याने एना फार चिंतेत होती. झोपताना ती डायपर घालून झोपत होती. यानंतर तिने ठरवलं की, ती आता डॉक्टरांकडे जाईल. चेकअप दरम्यान असं काही समजलं की, तिला धक्का बसला. चेकअप केल्यावर समजलं की, तिला कॅन्सर आहे. ज्यामुळे तिचा लघवीवर कंट्रोल नाही आणि त्यामुळे ती गादी ओली करते.

यामुळे नव्हता लघवीवर कंट्रोल

'द सन'च्या एका रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी सांगितलं की, तिच्या पेल्विक मसल्स कमजोर झाल्या आहेत. ज्यामुळे ती लघवी रोखून ठेवू शकत नाही. यानंतर पुढील ९ महिन्यात तिची स्थिती आणखीन बिघडली. ती एका दिवसात तीन डायपर वापरत होती. पण तिनही भिजत होते. 

२०१३ मध्ये स्मियर टेस्टनंतर तिला समजलं की, तिच्या सर्विक्समध्ये कॅन्सरचा ट्यूमर आहे. यावेळी डॉक्टरने सांगितलं की, तिला स्टेज १ चा कॅन्सर आहे आणि ती ५ वर्ष जीवंत राहू शकते. त्यानंतर सहा आठवडे महिलेची कीमो थेरपी चालली आणि तिला सांगण्यात आलं आहे की, तिचा ट्यूमर छोटा झाला आहे.  आता तिचं बेडवर लघवी करणं थांबलं होतं. पण जेव्हा ६ महिन्यांनी ती स्कॅनसाठी डॉक्टरकडे गेली तेव्हा डॉक्टरने सांगितलं की, तिचा कॅन्सर लंग्स पसरला आहे आणि तिला स्टेज ४ चा कॅन्सर आहे. ज्यातून वाचण्याची केवळ ५ टक्के शक्यता आहे. हे ऐकून एना आणि तिचा परिवार चिंतेत पडले.

कॅन्सरला हरवलं

अशा स्थितीत एनाच्या परिवाराने तिची साथ सोडली नाही. तिची ५ महिने कीमो थेरपी चालली. ती पूर्णपणे कमजोर झाली होती. तिचे केस गेले होते. पण तिने हिंमत हारली नाही. जेव्हा ती पुन्हा ६ महिन्यांनी स्कॅन करण्यासाठी गेली तेव्हा डॉक्टर हे बघून हैराण झाले की, तिचा कॅन्सर नष्ट झाला होता. खास बाब म्हणजे डॉक्टरांची ५ वर्षांची डेडलाइनही पूर्ण झाली होती. ती त्यापेक्षा जास्त जिवंत राहिली. तेव्हा तिचं जीवन पूर्णपणे बदललं. एनाने तिचं वजन कमी केलं. ट्यूमर गेल्यावर आता ती बेड ओला करत नाही. कारण ट्यूमर तिच्या ब्लॅडरवर दबाव टाकत होता, ज्यामुळे तिची लघवी आपोआप निघत होती.

हे पण वाचा :

सैन्यात केस बारीकच का ठेवतात? जेव्हा कारणं जाणून घ्यास तेव्हा सॅल्यूट कराल!
 

Web Title: England : 33 year old woman urinate on the bed know cervical cancer treatment story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.