इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी महिला क्रीडामंत्र्याला सर्वांसमोर केले किस; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 16:40 IST2024-07-31T16:38:20+5:302024-07-31T16:40:00+5:30
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी क्रीडामंत्री अमेली ओडेया-कॅस्टेरा यांना सर्वांसमोर किस केले.

इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी महिला क्रीडामंत्र्याला सर्वांसमोर केले किस; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Emmanuel Macrons : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macrons) यांचा एक फोटो सध्या संपूर्ण फ्रान्समध्ये चर्चेचा विषय बनले आहे. शुक्रवारी(दि.26) पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या उद्घाटन समारंभात मॅक्रॉन यांनी महिला क्रीडा मंत्री अमेली ओडेया-कॅस्टेरा (Amelie Oudea Castera) यांना सर्वांसमोर किस केले. या किसिंगचा फोटोही सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
फोटोमध्ये अमेली ओडेया, मॅक्रॉन यांच्या मानेचे चुंबन घेत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, यावेळी अमेलीचा एक हात त्यांच्या मानेभोवती अन् दुसऱ्या हात त्यांच्या हातात दिसत आहे. तर, या फोटोमध्ये फ्रान्सचे पंतप्रधान गॅब्रिएल अट्टल आपली नजर हटवताना दिसत आहेत. हा फटो पहिल्यांदा मॅडम फिगारो या फ्रेंच मासिकाने प्रकाशित केला.
40 लाखांहून अधिक लोकांनी फोटो पाहिला
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरू असून, आतापर्यंत 40 लाखांहून अधिक लोकांनी हा फोटो पाहिला आहे. तसेच, अनेकजण शेअर आणि कमेंट्सही करत आहेत. काही जणांचे म्हणने आहे की, फ्रान्समध्ये किस करणे सामान्य आहे आणि या गोष्टीची फार चर्चा होण्याची गरज नाही. काही जणांनी मॅक्रॉन यांची पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन या किसवर कशी प्रतिक्रिया देईल, याची कल्पना करुन मीम्सदेखील तयार करत आहेत.