अमेरिकेत ट्रम्प यांच्या आधी 'या' ३ दिग्गजांना भेटले PM मोदी, मस्क यांच्यासोबत 'या' 4 मुद्द्यांवर चर्चा झाली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 00:22 IST2025-02-14T00:21:54+5:302025-02-14T00:22:22+5:30
इलॉन मस्क यांच्या भेटी संदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, वॉशिंगटन डीसीमध्ये इलॉन मस्क यांच्यासोबत चांगल्या प्रकारे बैठक पार पडली...

अमेरिकेत ट्रम्प यांच्या आधी 'या' ३ दिग्गजांना भेटले PM मोदी, मस्क यांच्यासोबत 'या' 4 मुद्द्यांवर चर्चा झाली!
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. ते आज व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी वाशिंग्टन डीसीच्या ब्लेअर हाऊसमध्ये अमेरिकेचे NSA मायकल व्हॉल्ट्ज यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर आणि NSA अजीत डोवालही उपस्थित होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्यातही चर्चा झाली.
इलॉन मस्क यांच्या भेटीनंतर काय म्हणाले मोदी? -
इलॉन मस्क यांच्या भेटी संदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, वॉशिंगटन डीसीमध्ये इलॉन मस्क यांच्यासोबत चांगल्या प्रकारे बैठक पार पडली. आमच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यात मस्क यांच्या आवडीच्या, स्पेस, मोबिलिटी, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन आदी मुद्द्यांचा समावेश होता. याशिवाय मी सुधारणा आणि 'किमान सरकार, कमाल प्रशासना'च्या दिशेने भारताच्या प्रयत्नांवरही चर्चा केली.
Had a very good meeting with @elonmusk in Washington DC. We discussed various issues, including those he is passionate about such as space, mobility, technology and innovation. I talked about India’s efforts towards reform and furthering ‘Minimum Government, Maximum Governance.’ pic.twitter.com/7xNEqnxERZ
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2025
कुटुंबीयांसह आले होते मस्क -
यावेळी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क आपल्या कुटंबासह पोहोचले होते. ते आपल्या मुलांच्या हातात हात टाकून पंतप्रधआन मोदींच्या भेटीसाठी आले होते. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचे अत्यंत निकटवर्ती नेते विवेक रामास्वामी देखील पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी आले होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्यापूर्वी, बांगलादेशी लोकांनी व्हाइट हाऊसबाहेर निदर्शनही केले. यावेळी, निदर्शकांनी बांगलादेशात शांतता प्रस्थापित करण्याची मागणी केली.