एलॉन मस्क यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन; कोणत्या सदस्याने मांडला प्रस्ताव? वाचा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 08:12 IST2025-01-30T08:10:18+5:302025-01-30T08:12:49+5:30

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्स व एक्स सारख्या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.

Elon Musk has become a candidate for the Nobel Peace Prize: what is known about the nomination, Slovenian MEP nominates Musk  | एलॉन मस्क यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन; कोणत्या सदस्याने मांडला प्रस्ताव? वाचा... 

एलॉन मस्क यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन; कोणत्या सदस्याने मांडला प्रस्ताव? वाचा... 

वॉशिंग्टन : नोबेल पुरस्कार (Nobel Prize) हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते. दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्स व एक्स सारख्या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.

स्लोव्हेनियाचे युरोपियन संसद सदस्य (MEP) ब्रँको ग्रिम्स यांनी अधिकृतपणे एलॉन मस्क यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ब्रँको ग्रिम्स यांच्या म्हणण्यानुसार, एलॉन मस्क यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी समर्थन दिले आहे. तसेच, जागतिक शांतता राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे एलॉन मस्क यांना या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.

या प्रस्तावाला ब्रँको ग्रिम्स यांनी दुजोरा दिला आणि सांगितले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूलभूत मानवी अधिकार आणि शांततेसाठी सातत्याने समर्थन करणाऱ्या एलॉन मस्क यांना २०२५ साठी शांतता नोबेल पुरस्कार मिळावा, असा आज यशस्वीपणे प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच, या नामांकनासाठी पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकांचे ब्रँको ग्रिम्स यांनी आभार मानले. या आव्हानात्मक प्रस्तावासाठी मदत करणाऱ्या सर्व समर्थकांचे आणि सहकाऱ्यांचे मनापासून आभार, असे ब्रँको ग्रिम्स म्हणाले.

सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार 
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते. नोबेल पुरस्कार हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. नोबेल पुरस्कार विजेत्यांना सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्रासह मोठी रक्कम दिली जाते.

Web Title: Elon Musk has become a candidate for the Nobel Peace Prize: what is known about the nomination, Slovenian MEP nominates Musk 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.