Elon Musk Girlfriend: सहा पोरांचा बाप, तीन लग्ने! तरीही एलन मस्क या पोरीच्या प्रेमात पडले; कोण आहे ती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 18:15 IST2022-02-21T18:11:28+5:302022-02-21T18:15:21+5:30
Elon Musk Girlfriend: सप्टेंबर २०२१ मध्ये मस्क तिसरी पत्नी ग्रिम्सपासून वेगळे झाले. पण स्वस्थ बसतील ते मस्क कुठले.

Elon Musk Girlfriend: सहा पोरांचा बाप, तीन लग्ने! तरीही एलन मस्क या पोरीच्या प्रेमात पडले; कोण आहे ती...
वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत आणि तेवढेच प्रसिद्ध व्यक्ती ज्यांच्या एका वाक्याने क्रिप्टोकरन्सी धडा धडा कोसळते ते एलन मस्क यांचे लफडे समोर आले आहे. स्पेसएक्स आणि टेस्ला सांभाळता सांभाळता एवढी अफेअर करण्यासाठी त्यांना वेळ कुठून मिळतो, असा प्रश्न पडेल अशी वेळ आली आहे. काही महिन्यांपूर्वीच मस्क यांनी त्यांच्या तिसऱ्या पत्नीला घटस्फोट देत, घरदार विकत प्रोजेक्टच्या जवळ एक घर बांधून राहत आहेत. पण स्वस्थ बसतील ते मस्क कुठले. (World's Richest Man Elon Musk affaire)
एलन मस्क हे आता ऑस्ट्रेलियन अॅक्ट्रेस नताशा बैसेट (Australian Actress Natasha Bassett) हिच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. इथे महत्वाची बाब म्हणजे मस्क यांची यापूर्वी तीन लग्ने झाली आहेत. या पत्नींपासून त्यांना सहा मुलेही आहेत. आता चौथे लग्न करण्याच्या तयारीत मस्क लागले आहेत. आधीच्या तीन पत्नींशी त्यांनी काडीमोड घेतला आहे.
मस्क हे गल्फस्ट्रीम प्रायव्हेट जेटमधून लॉस एंजेलिसला नताशा बॅसेटसोबत प्रवास करताना दिसले आणि त्यांचे हे अफेअर जगजाहीर झाले. डेलीमेलच्या वृत्तानुसार, 27 वर्षीय नताशा बॅसेट आपल्या संपत्तीपेक्षा 50 वर्षीय एलन मस्कच्या अद्भुत 'प्रतिभे'ने प्रभावित झाली आहे. नताशा काही काळापासून इलॉन मस्कला फॉलो करत होती. दोघे आधी चांगले मित्र बनले आणि नंतर त्याची माजी पत्नी सिंगर ग्रिम्सपासून वेगळे झाल्यानंतर मस्क नताशाशी जवळीक साधू लागले.
hollywoodlife.com च्या आणखी एका अहवालात दावा केला आहे की एलन मस्क आणि नताशा गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सप्टेंबर २०२१ मध्ये मस्क तिसरी पत्नी ग्रिम्सपासून वेगळे झाले. नताशाला इलॉन मस्कची प्रेयसी म्हणून नव्हे तर स्वतःहून प्रसिद्ध व्हायचे आहे आणि मस्क तिला यात पूर्ण पाठिंबा देत आहे.