ट्रम्प सरकारसाठी धोक्याची घंटा; इलॉन मस्क ठरणार भस्मासुर ? सर्वेक्षणातून धक्कादायक दावा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 20:35 IST2025-03-10T20:34:28+5:302025-03-10T20:35:21+5:30
Elon Musk Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर इलॉन मस्कचा मोठा प्रभाव असल्याचे म्हटले जात आहे.

ट्रम्प सरकारसाठी धोक्याची घंटा; इलॉन मस्क ठरणार भस्मासुर ? सर्वेक्षणातून धक्कादायक दावा...
Elon Musk Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. त्यांच्या निर्णयांचा संपूर्ण जगावर परिणाम जाणवतोय. विशेष म्हणजे, ट्रम्प यांची सत्ता आणण्यात उद्योगपती इलॉन मस्क यांचा मोठा वाटा आहे. जो बायडेन यांना सत्तेवरुन हटवण्यासाठी मस्क यांनीच डोनाल्ड ट्रम्प यांना आर्थिक मदत पुरवली होती. मस्क आणि ट्रम्प यांच्या मैत्रीची जगभर चर्चा सुरू आहे. पण, आता हीच मैत्री धोक्याची घंटा बनू शकते, असे एका अहवालात म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर इलॉन मस्क यांच्यावर व्हाईट हाऊसची मोठी जबाबदारीही सोपवली आहे. मस्क यांच्याकडे शासकीय कार्यक्षमता विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी मिळताच मस्क मोठमोठे निर्णय घेत आहेत. पण एका सर्वेक्षणाने ट्रम्प यांचे टेन्शन वाढवले आहे. इलॉन मस्क, ट्रम्पसाठी 'भस्मासुर' बनू शकतात, असे सीएनएनच्या सर्वेक्षणात म्हटले आहे.
सीएनएनचे सर्वेक्षण
इलॉन मस्क, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कामात हस्तक्षेप करतात, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 54 टक्के अमेरिकन नागरिकांचे म्हणणे आहे. मस्क कर्मचाऱ्यांची स्वत:च्या गरजेनुसार वर्गवारी करत आहे, ज्याचा भविष्यात परिणाम होऊ शकतो. बहुतांश लोकांचा असा विश्वास आहे की, ट्रम्प प्रशासनाच्या खर्चावर मस्कचा प्रभाव आहे. 42 टक्के लोकांनी सांगितले की, ट्रम्प जे करत आहेत, ते चुकीचे आहे आणि त्याचा अमेरिकेला कोणत्याही प्रकारे फायदा होणार नाही.
ट्रम्प मस्कचे पंख कापणार?
इकडे ट्रम्प यांनाही याची जाणीव झाली आहे. ते सतत मस्कचे पंख कापण्यात व्यस्त आहेत. नुकतेच ट्रम्प यांनी मस्कचा आदेश हा अंतिम आदेश नसल्याचे म्हटले आहे. यापूर्वी त्यांनी मस्क यांना सूट दिली होती. इतकेच नाही, तर याआधी मस्क देखील टी-शर्ट घालून व्हाईट हाऊसमध्ये जात होते, मात्र आता त्यांनी आपला ड्रेस कोड बदलला आहे. मस्क आता कोट घालून व्हाईट हाऊसला जाणार आहेत.