शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
2
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
3
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
4
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
5
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
7
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
8
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
9
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
10
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
11
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
12
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
13
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
14
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
15
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
16
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
17
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
18
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
19
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
20
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल

एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 09:57 IST

Elon Musk and Vivek Ramaswamy: सरकारमधील काही मोठ्या पदांवरील नियुक्त्या केल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योजक एलॉन मस्क आणि भारतीय वंशाचे नेते विवेक रामास्वामी यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.

नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पराभूत केले. आता २० जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. मात्र तत्पूर्वी ट्रम्प यांनी त्यांच्या पुढील सरकारमधील सहकाऱ्यांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. सरकारमधील काही मोठ्या पदांवरील नियुक्त्या केल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योजक एलॉन मस्क आणि भारतीय वंशाचे नेते विवेक रामास्वामी यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.    

एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी हे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट एफिशियन्सी (DoGE) विभागाचं नेतृत्व करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, मला हे सांगताना आनंद होत आहे की, ग्रेट एलॉन मस्क आणि अमेरिकन देशभक्त विवेक रामास्वामी हे एकत्र मिळून डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट एफिशियन्सीचं नेतृत्व करतील.  सेव्ह अमेरिका मुव्हमेंटसाठी हे आवश्यक आहे. हे दोघेही मिळून माझ्या सरकारमधील नोकरशाहीला स्वच्छ करण्यापासून वायफळ खर्चामध्ये कपात करण्यासह, अनावश्यक नियमांना संपुष्टात आणून केंद्रीय यंत्रणांच्या पुनर्रचनेसाठी काम करतील. ही बाब आमच्या काळातील मॅनहॅटन प्रकल्प ठरू शकतो. रिपब्लिकन नेत्यांनी दीर्घकाळापासून DOGE चे उद्देश पूर्ण करण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे.  

अमेरिकन सरकारच्या कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर  एलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, यामुळे सरकारी निधी वाया घालवणाऱ्याा लोकांना थेट संदेश मिळणार आहे. तर विवेक रामास्वामी यांनी सांगितले की, एलॉन मस्क गांभीर्याने काम करतील. दरम्यान, विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून दावेदारी केली होती. मात्र नंतर त्यांनी आपली दावेदारी मागे घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांना आपला पाठिंबा दिला होता.  

टॅग्स :US ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कUnited Statesअमेरिका