Elon Musk: तिसऱ्या अब्जाधीशाचाही संसार 'मोडला'; गर्लफ्रेंडपासून वेगळे झाले एलन मस्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 13:36 IST2021-09-26T13:33:26+5:302021-09-26T13:36:46+5:30
Elon Musk and Grimes break up: मस्क यांनी त्यांच्या मुलाचे नाव X Æ A-Xii असे विचित्र ठेवले आहे. मस्क यांनी एका कामासाठी आपली सर्व घरे विकली आहेत. ते आता स्पेस एक्सच्या प्रकल्पाजवळच छोटेखानी घरात राहणार आहेत. हे घरही कधीही उचलून नेता येईल असे आहे.

Elon Musk: तिसऱ्या अब्जाधीशाचाही संसार 'मोडला'; गर्लफ्रेंडपासून वेगळे झाले एलन मस्क
टेस्ला आणि स्पेस् एक्स सारख्या कंपन्यांचे मालक आणि जगातील सर्वात मोठे अब्जाधीश एलन मस्क (Elon Musk) यांचा गर्लफ्रेंड ग्रीम्ससोबतचा संसार मोडला आहे. या दोघांनी तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दोघांमध्ये संबंध चांगले आहेत. मस्क यांनी एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या मुलाचा ताबा कोणाकडे असेल यावर चर्चांना उत आला आहे. (Elon Musk says he and Grimes are 'semi-separated')
मस्क यांनी त्यांच्या मुलाचे नाव X Æ A-Xii असे विचित्र ठेवले आहे. मस्क यांनी एका कामासाठी आपली सर्व घरे विकली आहेत. ते आता स्पेस एक्सच्या प्रकल्पाजवळच छोटेखानी घरात राहणार आहेत. हे घरही कधीही उचलून नेता येईल असे आहे. यामुळे मस्क यांनी हा वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांचा मुलगा हा गर्लफ्रेंड ग्रीम्ससोबत आहे. दोघं मिळून त्याचे संगोपन करतील असे मस्क म्हणाले. आम्ही सेमी सेपरेट झालो आहोत. मला कामासाठी टेक्सासला किंवा फिरतीवर रहावे लागते तर ग्रीम्स गायिका असल्याने तिला लॉस अँजेलिसला रहावे लागते.
Girish Mathrubhootam: मालक असावा तर असा! आपल्या 500 कर्मचाऱ्यांना करोडपती केले, अपार कष्ट झेलले
या नंतर ट्विटरवर लोकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांना सर्वाधिक रुची त्यांच्या मुलामध्ये होती. त्याची कस्टडी कोणाकडे राहणार असा प्रश्न बहुतेक लोक विचारत आहेत. दुसरीकडे त्याच्या या विचित्र नावाबाबतही लोक वेगवेगळे बोलत आहेत. हे नाव कसे उच्चारायचे असेही विचारले जात आहे. तर काहींनी टिंगल कररत जर मस्क नाव विसरले तर ते बेबी एक्स अशी हाक मारतील असे म्हटले आहे.
अमेरिकेच्या CIA वर भारतात झाला जगातील सर्वात रहस्यमय हल्ला; सुपरपॉवर 'हवाना सिंड्रोम'मुळे हतबल
ग्रीम्सने एकदा या नावाचा अर्थ सांगितला होता. तेव्हा तो कोणाच्या लक्षात आला नाही. X Æ A-12 हे नाव एलन आणि ग्रीम्सच्या आवडत्या विमानाचे आहे, असे सांगितले जाते. अनेकांना तर हे जोडपे लोकांची मस्करी करत असल्याचे वाटते.
अशाप्रकारे वेगळे होणारे मस्क हे जगातील तिसरे अब्जाधीश आहेत. याआधी अॅमेझॉ़नचे मालक जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे त्यांच्या पत्नींपासून विभक्त झाले आहेत. मस्क यांचे प्रकरण जरा वेगळे आहे.