जर्मनीच्या दोन बारमध्ये गोळीबार; ८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 08:45 IST2020-02-20T08:29:16+5:302020-02-20T08:45:40+5:30

जर्मनीच्या दोन बारमध्ये गोळीबार ; फरार हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरू

eight dead in attack on shisha bars in Germany | जर्मनीच्या दोन बारमध्ये गोळीबार; ८ जणांचा मृत्यू

जर्मनीच्या दोन बारमध्ये गोळीबार; ८ जणांचा मृत्यू

ठळक मुद्देहनाऊमधल्या दोन शिशा बारमध्ये गोळीबारपहिल्या बारमध्ये तिघांचा, तर दुसऱ्या बारमध्ये पाच जणांचा मृत्यूएकापेक्षा जास्त जणांनी हल्ला केल्याची माहिती

हनाऊ: जर्मनीच्या हनाऊ शहरातल्या दोन शिशा बारमध्ये झालेल्या गोळीबारात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजता ही घटना घडली. एकापेक्षा जास्त जणांनी गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.







बारमध्ये गोळीबार केल्यानंतर अज्ञात व्यक्ती घटनास्थळावरुन फरार झाल्या. सध्या पोलीस बार परिसरात असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. पहिल्या बारमध्ये तिघांचा, तर दुसऱ्या बारमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हनाऊ फ्रँकफर्टपासून २५ किलोमीटर अंतरावर असून इथली लोकसंख्या १ लाखाहून जास्त आहे. 




जर्मनीच्या हनाऊमध्ये काल रात्रीच्या सुमारास गोळीबार झाला. हनाऊ शहराच्या मध्य भागात असेलल्या मिडनाईट बारमध्ये गोळीबाराची घटना घडली. यानंतर थोड्याच वेळात अरेना बारमध्ये गोळीबार झाला. यानंतर अज्ञात व्यक्तीनं घटनास्थळावरुन कारनं पळ काढला. पोलिसांच्या विशेष पथकानं हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे.

Web Title: eight dead in attack on shisha bars in Germany