PM नरेंद्र मोदींना इजिप्तचा सर्वोच्च नागरी सन्मान! ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्काराने केला गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 15:34 IST2023-06-25T15:32:07+5:302023-06-25T15:34:04+5:30

PM Modi In Egypt: जगभरातील विविध देशांनी पंतप्रधान मोदींना प्रदान केलेला हा १३ वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

egyptian president abdel fattah al sisi confers pm narendra modi with egypt highest state honour order of the nile award in cairo | PM नरेंद्र मोदींना इजिप्तचा सर्वोच्च नागरी सन्मान! ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्काराने केला गौरव

PM नरेंद्र मोदींना इजिप्तचा सर्वोच्च नागरी सन्मान! ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्काराने केला गौरव

PM Modi In Egypt: अमेरिकेच्या दौऱ्यानंतर भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी इजिप्त दौऱ्यावर आहेत. जागतिक स्तरावर पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचा मोठा गौरव करण्यात आला आहे. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कैरो येथे 'ऑर्डर ऑफ द नाईल' पुरस्काराने सन्मानित केले. हा इजिप्तचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी इजिप्तची राजधानी कैरो येथे पोहोचले. पंतप्रधान मोदी यांनी हेलिओपोलिस वॉर मेमोरियल आणि अल हकीम मशिदीला भेट दिली. पंतप्रधानांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे. या दौऱ्यावेळी या दौऱ्यादरम्यान इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव केला. 

पंतप्रधान मोदींना प्रदान केलेला हा १३ वा सर्वोच्च नागरी सन्मान

गेल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. जगभरातील विविध देशांनी पंतप्रधान मोदींना प्रदान केलेला हा १३ वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय इजिप्त दौऱ्यावर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांची कैरो येथे भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: egyptian president abdel fattah al sisi confers pm narendra modi with egypt highest state honour order of the nile award in cairo