भूकंपाने कहर! १५० जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; ८ सेकंदात म्यानमारसह ५ देश हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 00:17 IST2025-03-28T23:57:33+5:302025-03-29T00:17:30+5:30

२८ मार्च रोजी ८ सेकंद भूकंप झाला, यामुळे जगातील ५ देश हादरले.

Earthquake wreaks havoc 150 dead, over 700 injured; 5 countries including Myanmar shook in 8 seconds | भूकंपाने कहर! १५० जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; ८ सेकंदात म्यानमारसह ५ देश हादरले

भूकंपाने कहर! १५० जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; ८ सेकंदात म्यानमारसह ५ देश हादरले

आज म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. म्यानमारमध्ये सकाळी ११:३० वाजता ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, यामध्ये आतापर्यंत १४४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू म्यानमारमधील मंडाले शहरात होते, पण या भूकंपाचे धक्के भारत, थायलंड, बांगलादेश आणि चीनमध्येही जाणवले. 

भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान  झाले आहे आणि अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने भूकंपातील मृतांचा आकडा १० हजारांपेक्षा जास्त असू शकतो ही भीती व्यक्त केली आहे. 

म्यानमारमध्ये इतके भूकंप का होतात? 

म्यानमारमध्ये भूकंपाचे प्रमाण जास्त आहे. म्यानमारमध्ये दरमहा ८ भूकंप होतात. याचे कारण म्हणजे म्यानमारपासून रिंग ऑफ फायरपर्यंतचे अंतर जास्त नाही, तिथे जगातील ८१ टक्के भूकंप होतात. याशिवाय, म्यानमार हे भारतीय प्लेट्स आणि सुंडा प्लेट्सच्या मध्ये स्थित आहे, यामुळे तेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा म्यानमारमध्ये भूकंप होत राहतात आणि या फॉल्टला SAGAING फॉल्ट म्हणतात.

जर दिल्ली, मुंबई, बेंगळुरू किंवा चेन्नई सारख्या भारतीय शहरांना रिश्टर स्केलवर ७.७ तीव्रतेचा भूकंप आला तर या शहरांचे काय होईल? वेगवेगळ्या अहवालांमध्ये असे म्हटले आहे की ही शहरे इतक्या शक्तिशाली भूकंपाचा सामना करू शकणार नाहीत आणि येथील ७० ते ८० टक्के इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतात. येथे दाट लोकवस्ती आहे आणि येथील ४५ टक्के इमारती नकाशे आणि परवानगीशिवाय बांधल्या गेल्या आहेत आणि त्या बांधणारे कंत्राटदार सक्षम नाहीत आणि त्यांच्याकडे परवानाही नाही, ही पण एक समस्या आहे.

Web Title: Earthquake wreaks havoc 150 dead, over 700 injured; 5 countries including Myanmar shook in 8 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthquakeभूकंप