बँकॉक, म्यानमार अन् चीन भूकंपाने हादरला; पाहा 5 धक्कादायक व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:58 IST2025-03-28T14:56:34+5:302025-03-28T14:58:21+5:30

Earthquake in Bangkok-Myanmar: भूकंपामुळे अनेकांचा मृत्यू झाला, इमारती कोसळल्या, जनजीवन विस्कळीत झाले.

Earthquake Today: Severe earthquake in Bangkok, Myanmar and China; Watch 5 shocking videos... | बँकॉक, म्यानमार अन् चीन भूकंपाने हादरला; पाहा 5 धक्कादायक व्हिडिओ...

बँकॉक, म्यानमार अन् चीन भूकंपाने हादरला; पाहा 5 धक्कादायक व्हिडिओ...

Earthquake in Bangkok-Myanmar: आज(शुक्रवारी) थायलंडची राजधानी बँकॉक, म्यानमार, चीन आणि भारताच्या काही भागात भूकंवाचे दक्के जाणवले. बँकॉक, म्यानमारमधील भूकंवाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल होती. या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या, जनजीवन विस्कळीत झाले. म्यानमारमधील Sagaing हे भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपामुळे म्यानमारमधील मंडाले येथील इरावती नदीवरील लोकप्रिय एवा ब्रिजही कोसळल्याचे वृत्त आहे. भूकंपाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

खाली दिलेला हा व्हिडिओ म्यानमारचा आहे. भूकंपामुळे एकामागून एक अनेक इमारती कोसळल्या. या भीषण दुर्घटनेनंतर म्यानमारमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गोंधळानंतर लोक इकडून तिकडे धावताना दिसतात.

दुसरा व्हिडिओ थायलंडची राजधानी बँकॉक येथील आहे. येथे एक गगनचुंबी इमारत कोसळली. 

तिसऱ्या भूकंपाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ म्यानमारमधील आहे. येथे एक प्रतिष्ठित मंदिर कोसळल्याची बातमी समोर आली आहे.

चौथा व्हिडीओ बँकॉकचा आहे, जिथे लोकांना रेल्वे स्टेशनवर भूकंपाचे धोकादायक धक्के जाणवले आणि ट्रेनही खूप हादरली.

पाचवा व्हिडिओ बँकॉकचा आहे, जिथे भूकंपाचे हे धोकादायक दृश्य दिसले.


 

 

Web Title: Earthquake Today: Severe earthquake in Bangkok, Myanmar and China; Watch 5 shocking videos...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.