पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 00:04 IST2025-05-01T00:04:08+5:302025-05-01T00:04:47+5:30
या भूकंपामुळे झालेल्या जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानाची माहिती अद्याप मिळालेली नाही.

पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
Pakistan Earthquake: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झोप उडालेल्या पाकिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीने दणका दिला. पाकिस्तानमध्ये रात्रीच्या वेळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) नुसार, भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी हा भूकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी मोजण्यात आली. या भूकंपामुळे झालेल्या जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानाची माहिती अद्याप मिळालेली नाही.
मध्यम स्वरूपाचा भूकंप, पण...
भूगर्भशास्त्रीय जाणकारांच्या मते, पाकिस्तान तीन प्रमुख टेक्टोनिक प्लेट्सवर येतो. ते म्हणजे अरबी, युरो-एशियन आणि भारतीय. त्यामुळे देशात पाच भूकंपीय झोन तयार होतात. ४.४ तीव्रतेचा भूकंप मध्यम स्वरूपाचा मानला जातो. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता कमी असते असे म्हटले जाते. पण तसे असले तरीही त्याचा परिणाम संवेदनशील भागात जाणवू शकतो. यावेळी भूकंपाचे धक्के जाणवू लागताच लोक घाबरून घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी पळताना दिसले. प्राथमिक अहवालानुसार, कोणत्याही भागातून जीवित किंवा वित्तहानीची माहिती नाही.
दरम्यान, यापूर्वी मंगळवारी रात्री उशिरा न्यूझीलंडच्या पश्चिम किनाऱ्यावरही ६.२ तीव्रतेचा भूकंप जाणवला. तथापि, अधिकाऱ्यांनी कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त दिलेले नाही आणि त्सुनामीचा इशाराही देण्यात आलेला नाही. स्थानिक वेळेनुसार पहाटे १:०० वाजता भूकंप झाल्याचे अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने म्हटले आहे. त्याचे केंद्र न्यूझीलंडच्या इन्व्हरकारगिल शहरापासून ३०० किलोमीटर नैऋत्येस आणि समुद्रात पृष्ठभागापासून १० किलोमीटर खाली होते.