अफगाणिस्तानात भूकंपाचा तडाखा, ८०० जणांचा मृत्यू, २५०० जखमी; शेकडो घरे उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:21 IST2025-09-01T15:19:48+5:302025-09-01T15:21:39+5:30

अफगाणिस्तान भूकंप अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे खूप नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी आग्नेय भागात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले यामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली. या घटनेत सुमारे ८०० लोकांचा मृत्यू झाला आणि १५०० हून अधिक लोक जखमी झाले.

Earthquake hits Afghanistan, 800 dead, 2,500 injured hundreds of houses destroyed | अफगाणिस्तानात भूकंपाचा तडाखा, ८०० जणांचा मृत्यू, २५०० जखमी; शेकडो घरे उद्ध्वस्त

अफगाणिस्तानात भूकंपाचा तडाखा, ८०० जणांचा मृत्यू, २५०० जखमी; शेकडो घरे उद्ध्वस्त

भूकंपानेअफगाणिस्तानात मोठे नुकसान झाले. रात्री उशिरा अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की अनेक घरे जमीनदोस्त झाली. या दरम्यान ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक गंभीर जखमी झाले. भूकंपाचा परिणाम पाकिस्तान आणि भारतातही जाणवला.

चीनमध्ये भारताचा पाकिस्तानला धक्का! SCO च्या जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एकमताने निषेध

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, काल रात्री अफगाणिस्तानसह दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.० इतकी मोजण्यात आली.

८०० लोकांचा मृत्यू

अफगाणिस्तानातील नांगरहार सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रवक्ते नकीबुल्लाह रहीमी यांनीही भूकंपाची माहिती दिली. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे अनेक घरे कोसळल्याचे रहमी यांचे म्हणणे आहे. सुरुवातीला ९ जणांचा मृत्यू आणि १५ जण जखमी झाल्याचे वृत्त होते. परंतु आता ८०० जणांचा मृत्यू आणि १,५०० हून अधिक लोक जखमी झाल्याची भीती आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मृत आणि जखमींची संख्या बरीच जास्त आहे. त्या भागात पोहोचणे खूप कठीण आहे. 

भूकंप कधी झाला?

यूएसजीएसनुसार, भूकंपाचे केंद्र जलालाबादच्या ईशान्येस २७ किलोमीटर अंतरावर जमिनीखाली ८ किलोमीटर अंतरावर नोंदवले गेले. हा भूकंप रविवार-सोमवार रात्री १२:४७ वाजता झाला. अफगाणिस्तान व्यतिरिक्त, पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.

दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचा परिणाम 

मध्यरात्री अचानक भूकंप झाल्याने अनेक लोक घराबाहेर पळाले. लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के अफगाणिस्तानच्या तुलनेत सौम्य होते, त्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

Web Title: Earthquake hits Afghanistan, 800 dead, 2,500 injured hundreds of houses destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.