रेसिंगदरम्यान, भरधाव कार उलटली, अमेरिकन उद्योगपतीचा मृत्यू, परवाच मोदींसोबत स्टेट डिनरमध्ये झाले होते सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 13:59 IST2023-06-27T13:57:41+5:302023-06-27T13:59:45+5:30
narendra Modi: अमेरिकन अब्जाधीश आणि दिग्गज गुंतवणूकदार जेम्स क्राऊन यांचं अपघातात निधन झालं आहे. ते कार रेसिंग करत असताना हा अपघात झाला.

रेसिंगदरम्यान, भरधाव कार उलटली, अमेरिकन उद्योगपतीचा मृत्यू, परवाच मोदींसोबत स्टेट डिनरमध्ये झाले होते सहभागी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच आटोपलेला अमेरिका दौरा गाजला. या दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदींसांठी व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. या डिनरमध्ये मुकेश अंबानींपासून आनंद महिंद्रांपर्यंत अनेक उद्योगपती सहभागी झाले होते. तर गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला आदी सीईओसुद्धा या डिनरला आले होते. त्याशिवाय अमेरिकेली बऱ्याच उद्योगपतींनीही या डिनरल उपस्थितील लावली होती. या अमेरिकन उद्योगपतींमध्ये जेम्स क्राऊन यांचाही समावेश होते. दुर्दैवाने त्यांचं अपघातात निधन झालं आहे.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन अब्जाधीश आणि दिग्गज गुंतवणूकदार जेम्स क्राऊन यांचं अपघातात निधन झालं आहे. ते कार रेसिंग करत असताना हा अपघात झाला. जेम्स क्राऊन यांची कार नियंत्रण सुटून बॅरियरवर आदळली आणि त्यातच त्यांचं निधन झालं.
जेम्स क्राऊन यांची कार कोलोराडोच्या वुडी क्रीक येथे एस्पेन मोटरस्पोर्ट्स पार्कमध्ये अपघातग्रस्त झाली होती. जेपी मॉर्गन चेजचे सीईओ जेमी डिमन यांनी सांगितले की, या कठीण काळामध्ये आम्ही जिम आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत संवेदना व्यक्त करतो.