Duke of Edinburgh : Prince Philip, husband of Queen Elizabeth II, dies at 99 in london | Duke of Edinburgh : राणी एलिझाबेथ 2 चे पती प्रिन्स फिलीप यांचे निधन

Duke of Edinburgh : राणी एलिझाबेथ 2 चे पती प्रिन्स फिलीप यांचे निधन

ठळक मुद्दे प्रिन्स फिलीप आणि राजकुमारी एलिझाबेथ 2 यांचा विवाह सन 1947 मध्ये झाला होता. लग्नानंतर 5 वर्षांनी एलिझाबेथ महाराणी बनल्या होत्या. 

लंडन - इंग्लंडमधील महाराणी एलिजाबेथ 2 चे पती प्रिन्स फिलीप यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. द रॉयल फॅमिलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यांसंदर्भात माहिती दिली आहे. विंड्सर कासल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रिन्स फिलीप यांचा जन्म 10 जून 1921 रोजी कोर्फू येथील ग्रीक (द्वीप) वर झाला होता. 

फेब्रुवारी महिन्यातच प्रिन्स फिलीप यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी, ह्रदयसंबधीत रोगावर उपचारही करण्यात आले. त्यानंतर, मार्च महिन्यात एलिजाबेथ 2 चे पती प्रिन्स फिलीप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. 

दरम्यान, प्रिन्स फिलीप आणि राजकुमारी एलिझाबेथ 2 यांचा विवाह सन 1947 मध्ये झाला होता. लग्नानंतर 5 वर्षांनी एलिझाबेथ महाराणी बनल्या होत्या. प्रिन्स फिलिप आणि राणी एलिझाबेथ यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या लग्नाचा 73 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांना चार मुलं, आठ नातू आणि दहा पणतू आहेत. प्रिन्स फिलिप 2017 मध्ये शाही जबाबदाऱ्यांमधून निवृत्त झाले होते. राजघराण्याच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 22 हजारहून अधिक कार्यक्रमांना हजेरी लावली आणि 5 हजारपेक्षा जास्त भाषणं केली होती.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Duke of Edinburgh : Prince Philip, husband of Queen Elizabeth II, dies at 99 in london

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.