शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

"डियर हसबंड, तू दुसरीकडे बिझी असशील तर…’’ दुबईच्या राजकुमारीने इन्स्टावरून पतीला दिला तलाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 18:33 IST

Dubai Princess Shaikha Mahra Divorces Husband: दुबईचे राजे आणि संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या कुटुंबातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मकतूम यांच्या मुलीने सोशल मीडियावरून तिच्या पतीला तलाक देत असल्याची घोषणा केली आहे.

दुबईचे राजे आणि संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या कुटुंबातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मकतूम यांच्या मुलीने सोशल मीडियावरून तिच्या पतीला तलाक देत असल्याची घोषणा केली आहे. मकतूम यांची कन्या शेखा माहरा बिन्त यांचा गतवर्षीच निकाह झाला होता. तसेच त्यांनी दोन महिन्यांपूर्वी एका कन्येला जन्म दिला होता.

माहरा बिन्त यांनी इन्स्टाग्रामवरून पती शेख मना बिन मोहम्मद बिन राशिद बिन माना यांना तलाक देण्याची घोषणा केली. या घोषणेत त्या म्हणाल्या की, ‘’डियर हसबंड, एवढ्यात तुम्ही इतर लोकांसोबत बिझी असाल, यादरम्यान मी आपल्या तलाकची घोषा करत आहे. मी तुम्हाला तलाक देते, मी तुम्हाला तलाक देते, मी तुम्हाला तलाक देते. लक्षात ठेवा. तुमचीच माजी पत्नी’’, अशा शब्दात माहरा बिन्त यांनी तलाकची घोषणा केली आहे.

१९९४ मध्ये जन्मलेल्या माहरा बिन्त यांनी गतवर्षी २७ मे रोजी शेख मना बिन यांच्याशी निकाह केला होता. त्यानंतर पाच महिन्यानंतर आपण गर्भवती असल्याची घोषणा माहरा बिन्त यांनी केली होती. तसेच त्याबाबतचे फोटोही सोशल मीडियावर अपलोड केले होते. तसेच त्याखाली आम्ही तीन असं लिहिलं होतं. मात्र आता घटस्फोटाची घोषणा करताना माहरा बिन्त यांनी स्वत:चा आणि मुलीचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्याखाली आम्ही दोघे असं लिहिलं आहे. 

यूएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी हल्लीच आपल्या कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल केले होते. तसेच त्यांनी त्यांच्या मुलाची यूएईच्या संरक्षणमंत्रीपदी नियुक्ती केली होती. त्याशिवाय त्यांनी आपल्या मंत्रालयात आणखी काही फेरबदलांची घोषणा केली होती.  

टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीFamilyपरिवारDivorceघटस्फोटrelationshipरिलेशनशिप