शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनची लबाडी! न्यूक्लियर मिसाइलमध्ये इंधनाऐवजी भरलं पाणी; जिनपिंग यांच्या खास जनरलला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:07 IST

चीनच्या ताफ्यातील अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांमध्ये चक्क इंधनाऐवजी पाणी भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आपल्या लष्करी ताकदीचा जगभर गाजावाजा करणाऱ्या चीनच्या पायाखालची जमीन सरकली आहे. चीनच्या ताफ्यातील अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांमध्ये चक्क इंधनाऐवजी पाणी भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी हा खळबळजनक खुलासा केल्यानंतर, संतापलेल्या राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या रॉकेट फोर्सच्या वरिष्ठ नेतृत्वाला घरचा रस्ता दाखवला आहे. इतकेच नव्हे तर, जिनपिंग यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे टॉप जनरल झांग यूक्सिया यांनाही याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय? 

अमेरिकन इंटेलिजन्स रिपोर्टनुसार, पश्चिम चीनमधील काही मिसाइल तळांवर तैनात केलेली क्षेपणास्त्रे तातडीने डागण्याच्या स्थितीत नव्हती. जेव्हा या क्षेपणास्त्रांची सखोल तपासणी करण्यात आली, तेव्हा त्यातील इग्निशन सिस्टम निकामी असल्याचे आढळले. धक्कादायक बाब म्हणजे, या मिसाइल्समध्ये हाय-ग्रेड इंधनाच्या जागी पाणी भरण्यात आले होते. लष्करी साहित्यात केलेल्या या मोठ्या भ्रष्टाचाराने चीनच्या सामरिक क्षमतेचे धिंडवडे काढले आहेत.

जिनपिंग यांच्या खास जनरलवर कारवाई 

या भ्रष्टाचारामुळे शी जिनपिंग यांनी आपली 'स्वच्छता मोहीम' सुरू केली आहे. जनरल झांग यूक्सिया, जे सेंट्रल मिलिटरी कमिशनमध्ये जिनपिंग यांच्यानंतरचे सर्वात शक्तिशाली अधिकारी होते, त्यांना तडकाफडकी ताब्यात घेण्यात आले आहे. झांग यांच्यावर केवळ भ्रष्टाचारच नाही, तर अण्वस्त्रांशी संबंधित गुप्त माहिती अमेरिकेला पुरवल्याचा आणि पदाच्या बदल्यात लाच घेतल्याचाही गंभीर आरोप आहे.

रॉकेट फोर्समध्ये मोठी साफसफाई 

चीनची रॉकेट फोर्स ही देशाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा कणा मानली जाते. गेल्या काही महिन्यांत या फोर्समधील संपूर्ण वरिष्ठ नेतृत्व बदलण्यात आले आहे. चीनच्या अधिकृत लष्करी वृत्तपत्रानेही यावर भाष्य करताना म्हटले आहे की, "भ्रष्टाचार हा लष्कराची लढण्याची क्षमता कमकुवत करतो आणि अशा गद्दारांविरुद्ध कठोर कारवाई करणे काळाची गरज आहे."

पाणी की मोठा कट? 

काही तज्ज्ञांच्या मते, क्षेपणास्त्रात पाणी असणे ही तांत्रिक चूक नसून लष्करी बजेट हडपण्यासाठी केलेला मोठा कट असू शकतो. तायवानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, चिनी लष्कराची ही पोलखोल झाल्याने शी जिनपिंग यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी नाचक्की झाली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : China's Rocket Force Scandal: Missiles Filled with Water, General Arrested

Web Summary : Chinese missiles were found filled with water instead of fuel, leading to the arrest of a top general. President Xi Jinping initiated a purge in the Rocket Force due to corruption and suspected leaks to the US, exposing vulnerabilities in China's military capabilities.
टॅग्स :chinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय