"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 18:07 IST2026-04-13T18:05:27+5:302026-04-13T18:07:06+5:30

US-China Update: पाकिस्तानातील चर्चा फिस्कटल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट पुन्हा सुरू झाला आहे. त्यावरूनच थेट चीनला टॅरिफची धमकी दिली. 

"Don't poke your nose into us", warned Donald Trump, China stands by Iran | "आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन

"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन

Iran America China latest Update: इस्लामाबादमधील चर्चा फिस्कटल्यानंतर इराण आणि अमेरिकेतली तणाव पुन्हा वाढला आहे. दोन्ही देश एकमेकांना लक्ष्य करत धमक्या, इशारे देऊ लागले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवर नाकाबंदीची घोषणा केली. इतकंच नाही तर चीनकडूनइराणची बाजू घेतली जात असल्याने ट्रम्प यांनी चीनला टॅरिफ वाढवण्याची धमकी दिली. त्यावर चीनने आमच्यामध्ये नाक खुपसू नका, असे सांगत ट्रम्प यांना इशारा दिला. 

डोनाल्ड ट्रम्प इराणला पुन्हा धमक्या देऊ लागले आहेत. अमेरिकेच्या निर्णयाची झळ इराणबरोबर चीनलाही बसण्याची शक्यता आहे. चीनकडून इराणला लष्करी शस्त्रास्त्र पुरवली गेल्याची गोपनीय माहिती अमेरिकेच्या हाती लागली. तेव्हापासून ट्रम्प चीनवर भडकले आहेत. 

चीनला ५० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी

ट्रम्प यांनी चीनचे नाव न घेता एक विधान केले होते की, याचे गंभीर परिणाम होतील. मला शंका आहे की, ते असे करतील. जर आम्ही त्यांना शस्त्रास्त्र पुरवताना पकडले तर त्यांच्यावर ५० टक्के टॅरिफ लावू, जी खरंच खूप मोठी रक्कम आहे. 

ट्रम्प यांना चीनचे उत्तर

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून धमक्या दिल्या जात असतानाच चीनने जाहीरपणे इराणला साथ दिली आहे. ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवर नाकाबंदी केल्याची घोषणा केल्यानंतर चीननेही उत्तर दिले. 

चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून यांनी म्हटले आहे की, "बीजिंग (चीन) जगात शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी कटिबद्ध आहे आणि पश्चिम आशियातील स्थितीवर नजर ठेवून आहे."

होर्मुझवर इराणचे नियंत्रण आणि ती आमच्यासाठी खुली

"आमची जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून सातत्याने येत-जात आहेत. इराणसोबत आमचे व्यापारी आणि ऊर्जा करार आहेत. आम्ही त्यांचा सन्मान करतो आणि आशा करतो की, इतर कोणी आमच्या दोघांमध्ये नाक खुपसणार नाही. होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण आहे आणि ही सामुद्रधुनी आमच्यासाठी खुली आहे", अशा शब्दात चीनने डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले आहे. 

Web Title : चीन की ट्रम्प को चेतावनी: हस्तक्षेप न करें; ईरान के साथ खड़ा है

Web Summary : ट्रम्प द्वारा शुल्क की धमकी के बाद चीन ने ईरान के साथ अपने संबंधों में हस्तक्षेप न करने की चेतावनी दी। चीन ईरान का समर्थन करता है, पश्चिम एशिया में स्थिरता और होर्मुज जलडमरूमध्य के माध्यम से निरंतर व्यापार पर जोर देता है, जो ईरान द्वारा नियंत्रित है।

Web Title : China Warns Trump: Don't Interfere; Stands with Iran Amid Tensions

Web Summary : China warns Trump against interfering in its relations with Iran after Trump threatened tariffs. China supports Iran, emphasizing its commitment to stability in West Asia and continued trade through the Strait of Hormuz, controlled by Iran.