शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

जितबो रे! डोनाल्ड ट्रम्पच राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार; पहिली निवडणूक जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 4:51 PM

मॅनडोनाल्ड यांनी त्यांचा पक्ष एकत्र असल्याचे सांगितले. प्रचार वेगाने सुरु आहे. आम्ही पुढील चार वर्षांसाठी पुन्हा तयार आहोत.

ठळक मुद्देट्रम्प यांच्या विजयानंतर रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख रोना मॅकडॅनिअल यांनी ट्विट करून ट्रम्प यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.फ्लोरिडा आणि इलिनॉय येथील प्राथमिक निवडणूक जिंकली आहे. दोन्ही ठिकाणी ट्रम्प यांना निवडणूक जिंकण्यासाठी झगडावे लागले नाही.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा ठरला. त्यांनी फ्लोरिडा आणि इलिनॉय येथील प्राथमिक निवडणूक जिंकली आहे. याचबरोबर त्यांच्या पारड्यात १२७६ डेलिगेट्स झाले आहेत. येत्या ३ नोव्हेंबरला अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. या विजयामुळे ट्रम्प यांची उमेदवारी रिपब्लिकन पक्षाकडून निश्चित मानली जात आहे.

ट्रम्प यांच्या विजयानंतर रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख रोना मॅकडॅनिअल यांनी ट्विट करून ट्रम्प यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पक्षाकडून अधिकृत उमेदवार बनल्याबद्दल अभिनंदनही केले आहे. दोन्ही ठिकाणी ट्रम्प यांना निवडणूक जिंकण्यासाठी झगडावे लागले नाही.

 

 

मॅनडोनाल्ड यांनी त्यांचा पक्ष एकत्र असल्याचे सांगितले. प्रचार वेगाने सुरु आहे. आम्ही पुढील चार वर्षांसाठी पुन्हा तयार आहोत. आता ट्रम्प यांना डेमोक्रेट्स पक्षाच्या प्रारंभिक निवडणुका जिंकलेल्यांशी लढावे लागणार आहे. डेमोक्रेटमधून जो बिडेन आणि बर्नी सँडर्स यांच्यामध्ये स्पर्धा आहे. यामध्ये बिडेन पुढे आहेत.

२०१६ च्या तुलनेत ट्रम्प यांनी आधीच उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. गेल्या वेळी मेच्या शेवटी उत्तरी डकोटा जिंकल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. ट्रम्पनी २०१७ मध्येच या निवडणुकीचा प्रचार सुरु केला होता.

अमरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष राहिलेल्या बिडेन यांनी चार राज्यांमध्ये विजय मिळविला आहे. यामध्ये वॉशिंग्टन, फ्लोरिडा, इलिनॉय आणि एरिझोना या संघराज्यांचा समावेश आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे एकूण 3979 सदस्य आहेत. पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांना 1991 सदस्यांचा पाठिंबा गरजेचा आहे. बिडेन यांना 1147 सदस्यांचे समर्थन मिळालेले आहे. यामुळे त्यांना 844 सदस्यांची गरज आहे. तर सँडर्स यांना 861 सदस्यांचे समर्थन मिळालेले आहे. तुलसी गबार्ड यांना केवळ दोनच सदस्यांचे समर्थन मिळालेले आहे.

 

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाElectionनिवडणूक