दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची हजेरी; ७ भारतीय CEO भेट घेणार, टॅरिफवर चर्चा अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:15 IST2026-01-21T16:14:30+5:302026-01-21T16:15:10+5:30

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे १९ ते २३ जानेवारीदमरम्यान World Economic Forum २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

Donald Trump's presence in Davos; 7 Indian CEOs to meet, discussion on tariffs expected | दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची हजेरी; ७ भारतीय CEO भेट घेणार, टॅरिफवर चर्चा अपेक्षित

दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची हजेरी; ७ भारतीय CEO भेट घेणार, टॅरिफवर चर्चा अपेक्षित

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे १९ जानेवारी ते २३ जानेवारीदमरम्यान, जगातील सर्वात प्रभावी आर्थिक मंच असलेल्या World Economic Forum (WEF) २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत १३० हून अधिक देशांतील सुमारे ३ हजार प्रतिनिधी आणि ८५० पेक्षा जास्त कंपन्यांचे CEO सहभागी होत आहेत.

‘A Spirit of Dialogue’ 

यंदा दावोस परिषद ‘A Spirit of Dialogue’ या थीमखाली जागतिक आर्थिक व व्यापारातील आव्हाने, गुंतवणुकीच्या संधी आणि नव्या आंतरराष्ट्रीय भागीदारी यांवर लक्ष केंद्रित करत आहे. बदलत्या भू-राजकीय पार्श्वभूमीत संवाद आणि सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करणे, हा यामागील उद्देश आहे.

ट्रम्प यांचे संबोधन

WEF च्या मंचावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबोधनानंतर एक विशेष डिनर आयोजित करण्यात येणार आहे. या डिनरला जागतिक उद्योगजगतातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात भारताकडून ७ नामांकित CEO's सहभागी होणार आहेत. 

एन. चंद्रशेखरन - Tata Sons चे चेअरमन; भारतीय उद्योगातील मान्यवर नेतृत्व

अनिश शाह - Mahindra Group चे ग्रुप CEO

सलील पारेख - Infosys चे CEO; भारताच्या टेक क्षेत्राचे प्रतिनिधित्व

श्रीनी पल्लिया - Wipro चे CEO

सुनील मित्तल - Bharti Enterprises चे चेअरमन

संजिव बजाज - Bajaj Finserv चे चेअरमन व एमडी

हरी एस. भरतिया - Jubilant Bhartia Group चे संस्थापक व सह-अध्यक्ष

कोणते मुद्दे चर्चेत येणार?

डिनरदरम्यान व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि धोरणनिर्मिती यांसारख्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या उपस्थितीत H-1B व्हिसा नियम, टॅरिफ सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणे हे मुद्देही चर्चेत येऊ शकतात. विशेषतः टॅरिफबाबत सखोल संवाद अपेक्षित आहे.

Web Title : दावोस में ट्रम्प: 7 भारतीय CEO से मिलेंगे, टैरिफ पर चर्चा

Web Summary : डोनाल्ड ट्रम्प दावोस WEF में भाग लेंगे, 7 भारतीय सीईओ के साथ चर्चा करेंगे। बातचीत व्यापार, निवेश, प्रौद्योगिकी और टैरिफ सुधारों पर केंद्रित होगी।

Web Title : Trump at Davos: Meeting with 7 Indian CEOs, Tariffs on Agenda

Web Summary : Donald Trump attends Davos WEF, engaging with 7 Indian CEOs. Discussions will focus on trade, investment, technology, and tariff reforms amidst evolving geopolitics.