डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:46 IST2025-07-17T13:45:08+5:302025-07-17T13:46:03+5:30

"अमेरिकेचे व्यापारी सहकारी मोठ्या प्रमाणावर प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यास अयशस्वी ठरले."

Donald Trump's aggressive tariff policy US us got nearly 50 billion extra customs revenues | डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आक्रमक टॅरिफ धोरण महसुलाच्या बाबतीत अत्यंत प्रभावी ठरताना दिसत आहे. जगातील काही देशांनी त्यांच्या या व्यापार धोरणावर टीका केली, तर बहुतेकांनी प्रत्युत्तर देणे टाळले. यामुळे, अमेरिकेला किमान प्रतिकारासह सुमारे 50 अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त कस्टम महसूल मिळाला आहे.

अमेरिकेचे व्यापारी सहकारी प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यास अयशस्वी -
फायनान्शिअल टाइम्सने म्हटले आहे की, "अमेरिकेचे व्यापारी सहकारी मोठ्या प्रमाणावर प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यास अयशस्वी ठरले." तसेच, भीतीने मागे हटतात असे म्हणत, राहण्याची खिल्ली उडवणारे ट्रम्प आता त्याचा फायदा घेत आहेत, असेही फायनान्शिअल टाइम्सने म्हटले आहे. 

ट्रम्प यांनी व्यापार युद्ध पुकारल्यानंतर, केवळ चीन आणि कॅनडानेच दिले प्रत्युत्तर -
ट्रम्प यांनी व्यापार युद्ध पुकारल्यानंतर, गेल्या चार महिन्यांत, केवळ चीन आणि कॅनडानेच त्यांनी लादलेल्या जागतिक टॅरिफविरुद्ध प्रत्युत्तरात्मक पावले उचलली आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, यात आयातीवर किमान 10 टक्के शुल्क, स्टील आणि अॅल्युमिनियमवर 50 टक्के शुल्क आणि ऑटोमोबाईल्सवर 25 टक्के शुल्क समाविष्ट आहे.

कस्टम ड्युटी संकलनात अब्जावधी डॉलर्सची वाढ - -
दरम्यान, शुक्रवारी अमेरिकन ट्रेझरीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेचा कस्टम महसूल विक्रमी 64 अब्ज डॉलरपर्यंत वाढला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 47 अब्ज डॉलर्सने अधिक आहे. तत्पूर्वी, ट्रेझरी विभागाने अहवाल दिला होता की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीमुळे जूनमध्ये कस्टम ड्युटी संकलन पुन्हा वाढले. आर्थिक वर्षात पहिल्यांदाच ते 100 अब्ज डॉलरच्या पपार गेले.

Web Title: Donald Trump's aggressive tariff policy US us got nearly 50 billion extra customs revenues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.