शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 05:43 IST

 देशबांधवांना भावनिक साद घालताना हॅरिस यांनी आपल्या शेवटच्या मुख्य भाषणात त्यांनी स्वत:ला एक लढाऊ नेत्या असल्याचे सांगितले.

वॉशिंग्टन :  रिपब्लिकन पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे अस्थिर असून, सूडभावनेने वेडे झाले आहेत, अशा शब्दांत डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल केला; तर, अमेरिकन नागरिकांना त्यांच्या विभाजनाच्या राजकारणाचा विरोध करण्याचे आवाहन केले. देशबांधवांना भावनिक साद घालताना हॅरिस यांनी आपल्या शेवटच्या मुख्य भाषणात त्यांनी स्वत:ला एक लढाऊ नेत्या असल्याचे सांगितले.

त्या म्हणाल्या की, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सैन्याचा वापर केवळ त्यांच्याशी असहमत असलेल्या अमेरिकन नागरिकांविरुद्ध करू इच्छित आहेत. अशी व्यक्ती अध्यक्षपदाची उमेदवार असू शकत नाही. हे एक असे व्यक्तिमत्त्व आहे, जे अस्थिर आहे, प्रतिशोधाने पछाडलेले आहे आणि असीम सत्ता मिळविण्यासाठी आक्रमक आहे.  ५ नोव्हेंबरच्या निवडणुकीत ६० वर्षीय हॅरिस व ७८ वर्षीय ट्रम्प यांच्यात सामना होणार आहे. 

ट्रम्प समर्थकांना बायडेन म्हणाले, कचरा अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांची तुलना कचऱ्याशी केली. काही दिवसांपूर्वी एका हास्य कलाकाराने केलेल्या टिप्पणीबद्दल ते बोलत होते.या कलाकाराने ट्रम्प यांच्या रॅलीमध्ये प्यूर्टो रिकोची तुलना कचऱ्याच्या बेटाशी केली होती. लॅटिनोत एका प्रचार कार्यक्रमादरम्यान बायडेन म्हणाले की, मला आजूबाजूला जो कचरा तरंगताना दिसत आहे. ते त्यांचे समर्थक आहेत. दरम्यान, या टिप्पणीचा डाेनाल्ड ट्रम्प यांनी निषेध केला आहे.

भारतीय-अमेरिकन वंशाच्या नागरिकांचे हॅरिस यांना समर्थन अटलांटा : डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना बहुतेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये भारतीय-अमेरिकन समुदायाकडून वाढता पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. भारतीय-अमेरिकन असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. वासुदेव पटेल म्हणाले, भारतीय वंशाच्या नेत्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. दिल्लीचे मूळ रहिवासी असलेले सौरभ गुप्ता म्हणाले की, मी गेल्या वेळी ट्रम्प यांना मतदान केले. पण, यावेळी मी कमला हॅरिस यांचे समर्थन करत आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पKamala Harrisकमला हॅरिसAmericaअमेरिका