Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:29 IST2025-08-08T15:28:32+5:302025-08-08T15:29:04+5:30

Donald Trump Tariff News : अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारताबाबत संयमी भूमिका घेण्याचा प्रयत्न केलाय.

Donald Trump Tariff News America is the one who messed up on tariffs! Trump's tough stance on India, but the Ministry of External Affairs is praising it | Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक

Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक

Donald Trump Tariff News :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांनी भारतावर ५० टक्के कर लादला आहे. ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापारावरही चर्चा थांबवल्या आहेत. यानंतर आता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे विधान समोर आले आहे. या विधानानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे भारताविषयी विधाने वेगवेगळी असल्याचे दिसत आहे. 

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारताबाबत संयमी भूमिका घेण्याचा प्रयत्न केलाय. 'भारत आमचा धोरणात्मक भागीदार आहे आणि आम्ही उघडपणे बोलतो आणि भविष्यातही असेच बोलत राहू', असं परराष्ट्र विभागाचे म्हणणे आहे. ( Tariff News )

Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

डोनाल्ड ट्रम्प  ( Donald Trump ) यांनी रशियन तेलाबाबत भारताला इशारा दिला होता. या तेलासाठीच भारताबाबत नाराजी व्यक्त केली होती, ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादला आहे आणि २७ ऑगस्टपासून २५ टक्के अतिरिक्त कर लागू करण्याची घोषणा केली आहे.

'भारतावरील कर आणखी वाढवू शकतात, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.  तर आता दुसरीकडे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय ट्रम्प यांच्या विधानाच्या विरुद्ध विधान देत आहेत. ( Tariff News )

भारतासोबत आता कोणतीही चर्चा नाही- ट्रम्प

दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार करारावर अधिक चर्चा करण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे एक पथक भारत दौऱ्यावर येणार होते.  दोन्ही देश लवकरच अनेक गोष्टींवर करार करू शकतात. पण आता 'जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत भारताशी व्यापाराबाबत कोणतीही चर्चा होणार नाही'असं ट्रम्प ( Donald Trump ) यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या याच विधानामुळे दोन्ही देशांमधील चर्चा थांबली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे विधान काय आहे?

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे भारतावरील टॅरिफबाबत ( Tariff News ) पहिल्यांदाच विधान समोर आले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाच्या उलट विधान परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे. परराष्ट्र विभागाचे प्रमुख उपप्रवक्ते टॉमी पिगॉट म्हणाले, "भारताच्या संदर्भात, मी एवढेच म्हणू शकतो की व्यापार असमतोल आणि रशियन तेल खरेदीबाबत राष्ट्रपती त्यांच्या चिंतांबद्दल अगदी स्पष्ट आहेत. तुम्ही त्यांना या प्रकरणात थेट कारवाई करताना पाहिले आहे." भारत हा एक धोरणात्मक भागीदार आहे त्यांच्याशी आमचा पूर्ण आणि स्पष्ट संवाद आहे आणि हे सुरूच राहील.

Web Title: Donald Trump Tariff News America is the one who messed up on tariffs! Trump's tough stance on India, but the Ministry of External Affairs is praising it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.