“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 13:39 IST2026-04-11T13:36:39+5:302026-04-11T13:39:00+5:30

Donald Trump America Iran War: अमेरिका इराण युद्धाविरामानंतर इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा सुरू होत आहे.

donald trump said it is not easy at all but we will open the strait of hormuz at any situation | “अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार

“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार

Donald Trump America Iran War: इराण-अमेरिका यांच्यातील युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होणारी ऐतिहासिक शांतता चर्चा अत्यंत नाजूक वळणावर असतानाच पश्चिम आशियातील तणाव पुन्हा विकोपाला गेला आहे. इस्रायल व हिजबुल्लाह यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे या वाटाघाटी फिस्कटण्याची भीती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे आणि इराणचे शिष्टमंडळ इस्लामाबाद येथे पोहोचले आहे. लवकरच दोन्ही देशांतील नेत्यांमध्ये वाटाघाटीच्या चर्चा सुरू होतील. या शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवा निर्धार व्यक्त केला आहे. 

इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात होणाऱ्या शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हेंस इराणसोबतच्या शांतता चर्चेत सहभागी होण्यासाठी इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. जर इराणने प्रामाणिकपणे चर्चेत भाग घेतला, तर अमेरिका रचनात्मक सहभागासाठी तयार आहे. जर इराणने चर्चेत काही चलाखी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच

इराणच्या सहकार्याने किंवा इराणच्या सहकार्याशिवाय होर्मुझ सामुद्रधुनी खुली करणारच. हे अजिबात सोपे नाही. काय चालले आहे ते मी शोधून काढेन. त्यांचा लष्करी पराभव झाला आहे, आणि आता करार होवो वा न होवो, आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करू. ती खुलीच राहील, असा निर्धार डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, पश्चिम आशियातील शत्रुत्व संपवण्याच्या उद्देशाने आयोजित शांतता चर्चेत सहभागी होण्यासाठी, नेते मोहम्मद बाकेर गालिबाफ यांच्या नेतृत्वाखालील इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दाखल झाले. इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमध्ये युद्धविराम या अटी ठेवण्यात आल्या आहेत.

 

Web Title : ट्रंप ने ईरान तनाव के बावजूद होर्मुज जलडमरूमध्य खोलने की कसम खाई।

Web Summary : नाजुक ईरान-अमेरिका शांति वार्ता के बीच, ट्रंप ने घोषणा की कि होर्मुज जलडमरूमध्य ईरानी सहयोग के साथ या बिना खोला जाएगा। इस्लामाबाद में बातचीत जारी है, लेकिन लेबनान युद्धविराम के संबंध में शर्तों के साथ तनाव अभी भी अधिक है।

Web Title : Trump vows to open Hormuz Strait despite Iran tensions.

Web Summary : Amidst fragile Iran-US peace talks, Trump declares the Hormuz Strait will be opened, with or without Iranian cooperation. Negotiations in Islamabad continue, but tensions remain high with conditions set regarding Lebanon ceasefire.