शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump: रशिया-युक्रेन शांतता कराराच्या अगदी जवळ, ट्रम्प यांचा दावा; मॉस्को-कीवकडे विशेष दूत रवाना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 09:21 IST

Russia Ukraine War:  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले असून, लवकरच दोन्ही देशांमध्ये अंतिम शांतता करार होईल, असा त्यांनी दावा केला आहे. ट्रम्प यांनी दोन्ही देशांतील तणाव मिटवण्यासाठी मॉस्को आणि कीव येथे त्यांचे विशेष दूत पाठवले आहे. 

व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, "मी नऊ महिन्यांत आठ युद्धे संपवली आहेत आणि आम्ही शेवटच्या युद्धावर काम करत आहोत. ते सोपे नव्हते. गेल्या महिन्यात २५,००० युक्रेनियन आणि रशियन सैनिक मारले गेले आहेत आणि मला वाटते की, आम्ही एका कराराच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत."

ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांची टीम शांतता टिकवण्यासाठी योजना राबवत आहे.  या योजनेचा आराखडा रशियन आणि युक्रेनियन प्रतिनिधींच्या माहितीनुसार सुधारित करण्यात आला आहे आणि आता त्यात फक्त काही मुद्दे मतभेदाचे राहिले आहेत.  ट्रम्प यांनी त्यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी थेट चर्चा करण्यासाठी मॉस्कोला जाण्याचे निर्देश दिले आहेत. यूएस आर्मी सेक्रेटरी डॅन ड्रिस्कॉल शांतता कराराच्या उर्वरित अटींवर काम करण्यासाठी युक्रेनियन अधिकाऱ्यांशी भेटणार आहेत.

ट्रम्प यांनी यापूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ते स्वतः राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना भेटण्यास उत्सुक आहेत. परंतु, ही भेट केवळ युद्ध संपवण्याचा करार अंतिम टप्प्यात असेल तेव्हाच होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Claims Russia-Ukraine Peace Deal Close; Envoys Sent to Moscow, Kyiv

Web Summary : Donald Trump claims a Russia-Ukraine peace deal is near, sending envoys to Moscow and Kyiv. His team is refining a peace plan, addressing remaining disagreements. Trump awaits finalization to meet Zelensky and Putin.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय