शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'भारत हळूहळू टॅरिफ कमी करेल, पण आम्ही 2 एप्रिलची तारीख चुकवणार नाही'- डोनाल्ड ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 15:16 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प परस्पर शुल्क लादण्यावर ठाम आहेत.

Donald Trump on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ वॉर छेडले आहे. त्यांनी अमेरिकन सामानांवर ज्यादा शुल्क(टॅरिफ) लादणाऱ्या प्रत्येक देशावर तेवढेच किंवा त्याहून अधिक शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी 2 एप्रिल ही तारीखही निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी या शुल्काच्या मुद्द्यावरुन भारतावर अनेकदा निशाणा साधला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी शुल्काच्या मुद्द्यावरुन भारताला सुनावले. 

यापूर्वी ट्रम्प यांनी भारताचे 'टॅरिफ किंग' असे वर्णन केले होते आणि भारत खूप अन्यायकारकपणे शुल्क आकारतो, असेही म्हटले होते. आता ब्रेटबार्ट न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणतात की, माझे भारताशी चांगले संबंध आहेत. पण, भारताची एक समस्या आहे, ते जगातील सर्वाधिक शुल्क लादणाऱ्या देशांपैकी एक आहेत. मला विश्वास आहे की, भारत हळूहळू शुल्क कमी करेल. मात्र, आम्ही 2 एप्रिलपासून परस्पर शुल्क लागू करण्यावर ठाम आहोत.

2 एप्रिलपासून परस्पर शुल्क लागूडोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच सांगितले होते की, 2 एप्रिलपासून अमेरिका त्यांच्या मालावर ज्यादा शुल्क लादणाऱ्या देशांवरही समान शुल्क लागू करेल, ना कमी ना जास्त. यूएस काँग्रेसला संबोधित करताना ते म्हणाले की, आमची योजना 1 एप्रिलपासून परस्पर शुल्क लागू करण्याची होती, परंतु 'एप्रिल फूल डे'शी जोडले जाऊ नये, म्हणून 2 एप्रिल तारीख ठरवली. इतर देशांनी अनेक दशकांपासून आमच्यावर ज्यादा शुल्क लादले, आता आमची पाळी आहे, असेही ट्रम्प म्हणाले.

परस्पर शुल्क काय आहे?परस्पर शुल्क हे असे कर आहेत, जे एका देशाद्वारे दुसऱ्या देशातून आयात केलेल्या वस्तूंवर लादले जातात. म्हणजेच एखादा देश अमेरिकन वस्तूंवर जे काही शुल्क लावतो, अमेरिका त्या देशाच्या वस्तूंवरही तेच शुल्क लावेल. अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी परस्पर शुल्काबाबत अनेकदा भाष्य केले होते. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतAmericaअमेरिका