'...तर तुमच्यावर 100% शुल्क लावणार', डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह सर्व BRICS देशांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:34 IST2025-01-31T15:33:13+5:302025-01-31T15:34:25+5:30

Donald Trump on BRICS : ब्रिक्समधील अतिमहत्त्वाचा देश असलेल्या भारताने काय भूमिका घेतली? पाहा...

Donald Trump on BRICS: we will impose 100% tariffs on you; Donald Trump's warning to all BRICS countries | '...तर तुमच्यावर 100% शुल्क लावणार', डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह सर्व BRICS देशांना इशारा

'...तर तुमच्यावर 100% शुल्क लावणार', डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह सर्व BRICS देशांना इशारा

Donald Trump on BRICS : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ब्रिक्स देशांना मोठा इशारा दिला आहे. 'ब्रिक्स देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकन डॉलरऐवजी अन्य कोणतेही चलन वापरण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर 100 टक्के शुल्क आकारले जाईल', असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे हा इशारा दिला.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणतात, 'ब्रिक्स देश डॉलरला पर्याय शोधणार आणि आम्ही फक्त पाहत बसायचे, ते दिवस गेले आता. आम्हाला ब्रिक्स देशांकडून शब्द हवाय की, ते नवीन ब्रिक्स चलन तयार करणार नाहीत किंवा अमेरिकन डॉलरच्या जागी इतर कोणत्याही चलनाला समर्थन देणार नाहीत. असे केल्यास, त्यांना 100 टक्के टॅरिफचा सामना करावा लागेल किंवा वाढणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेपासून दूर राहावे लागेल,' अशा शब्दात ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना खडसावले.

BRICS देशात भारताचा समावेश
BRICS ही ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती या दहा देशांची आंतरसरकारी संघटना आहे. 2009 मध्ये स्थापन झालेल्या BRICS हा एकमेव मोठा आंतरराष्ट्रीय गट आहे, ज्याचा अमेरिका भाग नाही. गेल्या काही वर्षांत ब्रिक्समधील देश, विशेषतः रशिया आणि चीन, अमेरिकन डॉलरला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारताची काय भूमिका?

ब्रिक्सचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या भारताने 'डी-डॉलरायझेशन' (जागतिक व्यापार आणि आर्थिक व्यवहारांमध्ये डॉलरच्या वापरात लक्षणीय घट) च्या विरोधात भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी डिसेंबरमध्ये सांगितले होते की, भारत कधीही 'डी-डॉलरीकरण'च्या बाजूने नाही आणि ब्रिक्स चलन तयार करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

Web Title: Donald Trump on BRICS: we will impose 100% tariffs on you; Donald Trump's warning to all BRICS countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.