डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:05 IST2025-09-18T14:03:17+5:302025-09-18T14:05:36+5:30
Donald Trump India Latest News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संसदेत प्रेसिंडेन्शियल डिटरमिनेशन सुपूर्द केले. यात त्यांनी भारतासह २३ देशांतून अमेरिकेत बेकायदेशीर ड्रग्ज पुरवठा केला जात असल्याचे म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत
Donald Trump Latest News: भारत, चीन, अफगाणिस्थान, पाकिस्तानसह २३ देश मोठे ड्रग्ज उत्पादक किंवा ड्रग्ज तस्करीचे अड्डे असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकन काँग्रेसला ट्रम्प यांनी अध्यक्षीय निर्धार (प्रेसिडेन्शियल डिटरमिनेशन) सादर केला असून, यात अमेरिकेत येत असलेली बेकायदेशीर ड्रग्ज २३ देशांमध्ये तयार केली जात आहेत, तसेच पाठवली जात आहे, असे म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या देशात ड्रग्ज निर्मिती आणि तस्करीसंदर्भात सुरू असलेल्या कृत्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असेही त्यात म्हटले गेले आहे.
सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रेसिडेन्शियल डिटरमिनेशन अमेरिकेच्या संसदेत सादर केले. व्हाईट हाऊसने यासंदर्भात सांगितले की, अमेरिकेत येत असलेल्या ड्रग्जची निर्मिती आणि कोणत्या देशातून त्याची तस्करी होत आहे, याबद्दलची महत्त्वाची यादी ट्रम्प यांनी दिली आहे.
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने याबद्दल एक मुद्दा स्पष्ट केला आहे. डिपार्टमेंटने म्हटले आहे की, ही यादी ड्रग्ज निर्मिती आणि तस्करीमध्ये तेथील सरकारचा सहभाग असल्याबद्दलची नाहीये. त्या देशांमधील व्यावसायिक, भौगोलिक आणि आर्थिक घटकांकडून ड्रग्ज निर्मिती आणि तस्करीला मदत केली जात आहे.
ट्रम्प यांनी दिलेली ड्रग्ज निर्मिती, तस्करी होणाऱ्या देशांची यादी
अफगाणिस्तान, बहामास, बेलीझ, बोलिव्हिया, म्यानमार, चीन, कोलंबिया, कोस्टा रिका, डोमिनिकन रिपब्लिक, एक्युदोर, अल साल्वादोर, गॉटेमेला, हैती, होंडूरस, भारत, जमैका, लाओस, मेक्सिको, निकारागुआ, पाकिस्तान, पनामा, पेरू, व्हेनेझुएला.