“आमचे लक्ष्य पूर्ण, पुढील दोन-तीन आठवड्यात अमेरिकी सैन्य इराण सोडेल”; ट्रम्प यांचा नवा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 08:42 IST2026-04-01T08:39:59+5:302026-04-01T08:42:10+5:30

Donald Trump America Iran War: ट्रम्प यांनी युद्ध लवकरच संपणार असल्याची घोषणा केली असली तरी, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी अद्याप युद्ध समाप्त करण्याची कोणतीही निश्चित भूमिका घेतलेली नाही.

donald trump new claims that our goal is complete american troops will leave Iran in the next two to three weeks | “आमचे लक्ष्य पूर्ण, पुढील दोन-तीन आठवड्यात अमेरिकी सैन्य इराण सोडेल”; ट्रम्प यांचा नवा दावा

“आमचे लक्ष्य पूर्ण, पुढील दोन-तीन आठवड्यात अमेरिकी सैन्य इराण सोडेल”; ट्रम्प यांचा नवा दावा

Donald Trump America Iran War: इराणमधील युरेनिअमचा साठा ताब्यात घेण्यासाठी व त्या देशाला अण्वस्त्र निर्मिती करण्यापासून रोखण्यासाठी इराणवर जमीनमार्गे थेट कारवाई करण्याचा आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या लष्कराला देण्याची व एप्रिलपर्यंत युद्ध संपविण्याची शक्यता आहे. तसे वृत्त अमेरिकी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. इराणकडे सुमारे ४०० किलो समृद्ध युरेनियम आहे, ज्याचा उपयोग ते अणुबॉम्ब बनवण्यासाठी करू शकतात असा अमेरिकेचा दावा आहे. यातच आमचे लक्ष्य आता पूर्ण झाले आहे, येत्या दोन ते तीन आठवड्यात अमेरिका इराणची भूमी सोडेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की, अमेरिका विशेष मोहिमेद्वारे इराणमधील अणुउर्जा सामुग्रीवर ताबा मिळवणार आहे. त्यामुळे ते युद्ध न लांबवता एप्रिलच्या मध्यापर्यंत संपवता येईल. ट्रम्प स्वतःही प्रदीर्घ काळ चालणारे युद्ध टाळण्याचा विचार करत आहेत. ट्रम्प यांनी म्हटले होते की, इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे तेथील अणुकार्यक्रमाची सर्व संसाधने नष्ट झाली आहेत. मात्र या हल्ल्यांमध्ये इराणच्या युरेनिअम साठ्याचे काहीही नुकसान झाले नव्हते.

युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेला इराणसोबत कोणत्याही कराराची गरज नाही

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेले युद्ध संपवण्यासंदर्भात एक मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिका लवकरच इराणमधून आपले सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करेल. युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेला इराणसोबत कोणत्याही कराराची गरज नाही. अमेरिकी सैन्य पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणमधून माघार घेईल. इराणमधील 'सत्तापालटाचे' उद्दिष्ट साध्य झाले आहे. त्यामुळे, अमेरिका आता हा संघर्ष लांबवण्याच्या बाजूने नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी तडजोडीसाठीची अट काढून टाकली असली तरी, युद्ध संपण्यापूर्वी करार होऊ शकतो असे संकेतही त्यांनी दिले. 

दरम्यान, ट्रम्प यांनी युद्ध लवकरच संपणार असल्याची घोषणा केली असली तरी, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी अद्याप युद्ध समाप्त करण्याची कोणतीही निश्चित भूमिका घेतलेली नाही. अलीकडेच नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, ते इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत निश्चित करू शकत नाहीत. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनी मारले गेले. खामेनी यांची मुलगी, जावई, सून आणि नात यांचाही या हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला. इतकेच नव्हे, तर अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणचे अनेक वरिष्ठ अधिकारीही मारले गेले.

 

Web Title : ट्रंप का नया दावा: अमेरिकी सैनिक कुछ हफ़्तों में ईरान छोड़ेंगे

Web Summary : ट्रंप का दावा है कि अमेरिकी सैनिक जल्द ही ईरान छोड़ देंगे, मिशन पूरा हुआ। एक विशेष अभियान में ईरान के परमाणु सामग्री को लक्षित किया गया, जिसका उद्देश्य बिना किसी ईरानी समझौते के शीघ्र अंत करना है। इजरायल ने अभी तक संघर्ष खत्म करने की पुष्टि नहीं की है।

Web Title : US troops to leave Iran in weeks: Trump's new claim

Web Summary : Trump claims US troops will exit Iran soon, mission accomplished. A special operation targeted Iran's nuclear materials, aiming for a swift end without needing any Iranian agreement. Israel hasn't confirmed ending the conflict.