शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
5
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
6
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
7
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
8
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
9
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
10
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
11
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
12
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
13
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
14
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
15
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
16
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
19
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प हॉस्पिटलबाहेर; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तज्ज्ञांची टीका

By ravalnath.patil | Updated: October 5, 2020 11:02 IST

Donald Trump : सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि साथीच्या आजारांवर चुकीची माहिती पसरवण्याबद्दल अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनावरील उपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, कोरोनावर उपचार सुरु असताना रविवारी ते काहीकाळ हॉस्पिटलमधून बाहेर गेले. बाहेर जाताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉस्पिटलसमोर उभे असलेल्या समर्थकांना अभिवादन केले. दरम्यान, कोरोनाशी संबंधित प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी वैद्यकीय समुदायाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

वॉशिंग्टनजवळील वॉल्टर रीड मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी बाहेर पडताना मास्क लावला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या बुलेटप्रूफ कारमधून हॉस्पिटलच्या बाहेरील समर्थकांना अभिवादन केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉस्पिटलमधून बाहेर पडण्यापूर्वी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओमध्ये ते म्हणाले, 'खऱ्या शाळेत जाऊन कोरोनाबाबत बरेच काही शिकायला मिळाले.' दरम्यान, सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि साथीच्या आजारांवर चुकीची माहिती पसरवण्याबद्दल अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याच सरकारने सार्वजनिक आरोग्यासंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे, असे अशी तक्रार तज्ज्ञांनी केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान आयसोलेशनमध्ये राहण्याची गरज आहे. तसेच, त्यांनी सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांच्या जीवालाही धोका पोहचविण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या आरोग्य तज्ज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या 'स्टंट'वर टीका केली आहे. राष्ट्राध्यक्षांच्या अनिवार्य प्रवासामुळे कारमधील प्रत्येक व्यक्तीला १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करणे आवश्यक आहे, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या आपत्ती औषध विभागाचे प्रमुख जेम्स फिलिप्स म्हणाले. तसेच, त्यांच्यासोबत असलेले व्यक्ती आजारी पडू शकतील. कदाचित त्यांचा मृत्यू होऊ शकेल. राजकीय फायद्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे जीवन धोक्यात घातले. हा वेडेपणा आहे, असेही जेम्स फिलिप्स यांनी सांगितले.
 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका