डोनाल्ड ट्रम्प सज्ज, अमेरिका इराणवर हल्ल्याच्या तयारीत; आठवड्याच्या शेवटी हल्ला करण्याच्या हालचाली सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:16 IST2026-02-20T10:15:55+5:302026-02-20T10:16:40+5:30
गेल्या काही दिवसांत पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणावर हवाई आणि नौदल संसाधने तैनात केल्यानंतर, अमेरिकेचे लष्कर या आठवड्याच्या अखेरीस हल्ल्यासाठी तयार असू शकते, अशी माहिती व्हाइट हाऊसला देण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प सज्ज, अमेरिका इराणवर हल्ल्याच्या तयारीत; आठवड्याच्या शेवटी हल्ला करण्याच्या हालचाली सुरू
वॉशिंग्टन : अमेरिकेचे लष्कर या आठवड्याच्या शेवटी इराणवर हल्ला करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले असून, या लष्करी कारवाईला अधिकृत मान्यता द्यायची की नाही, याबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही, असे वृत्त सीएनएन या वृत्तवाहिनीने दिले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
गेल्या काही दिवसांत पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणावर हवाई आणि नौदल संसाधने तैनात केल्यानंतर, अमेरिकेचे लष्कर या आठवड्याच्या अखेरीस हल्ल्यासाठी तयार असू शकते, अशी माहिती व्हाइट हाऊसला देण्यात आली आहे. मात्र, एका सूत्राने असे म्हटले आहे की, ट्रम्प यांनी खासगी चर्चेत लष्करी कारवाईच्या बाजूने आणि विरोधातही युक्तिवाद केला असून, सर्वोत्तम मार्ग कोणता असेल याबाबत त्यांनी आपले सल्लागार आणि मित्र राष्ट्रांचे मत जाणून घेतले आहे. दोन्ही देशांत जिनिव्हा येथे अणुकार्यक्रमाबद्दल चर्चा झाली असली तरी परस्पर देशांनी प्रत्युत्तराचा इशाराही दिला होता.
मार्को रुबियो लवकरच इस्रायल दौऱ्यावर जाणार
अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या अणुचर्चेबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो पुढील आठवड्यात इस्रायलचा दौरा करणार असून, ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना माहिती देणार आहेत, अशी माहिती ट्रम्प प्रशासनातील दोन अधिकाऱ्यांनी दिली. रुबियो २८ फेब्रुवारी रोजी नेतन्याहू यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
अमेरिका आणि इराणमध्ये अलीकडेच इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अप्रत्यक्ष चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. दोन्ही बाजूंनी या आठवड्यात जिनिव्हात झालेल्या चर्चेवरील प्रगतीबद्दल सावध सकारात्मकता व्यक्त केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी मूलभूत मुद्द्यांवर सहमती झाल्याची प्रतिक्रिया दिली होती.