डोनाल्ड ट्रम्प देताहेत केवळ पोकळ धमकी; NATO च्या बाहेर पडणं अमेरिकेला किती महागात पडेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 19:07 IST2026-04-02T19:05:54+5:302026-04-02T19:07:50+5:30

दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून १९४९ मध्ये NATO चा जन्म झाला. ज्याची स्थापना मूळ नॉर्थ अटलांटिक कराराद्वारे झाली

Donald Trump is only giving threats; How much will leaving NATO cost America? | डोनाल्ड ट्रम्प देताहेत केवळ पोकळ धमकी; NATO च्या बाहेर पडणं अमेरिकेला किती महागात पडेल?

डोनाल्ड ट्रम्प देताहेत केवळ पोकळ धमकी; NATO च्या बाहेर पडणं अमेरिकेला किती महागात पडेल?

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी १ एप्रिल २०२६ रोजी नॉर्थ अटलांटिक ऑर्गनाइजेशन म्हणजेच NATO मधून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. यापूर्वीही अनेक वेळा ट्रम्प यांनी अशाच धमक्या दिल्या आहेत, परंतु त्यापैकी एकाचीही अंमलबजावणी झालेली नाही, कारण अमेरिकेसाठी नाटोमधून बाहेर पडणे केवळ एक पत्रकार परिषद किंवा ट्विटची बाब नाही. यामुळे जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेची प्रतिमा धोक्यात येऊ शकते. 

NATO सोडण्याची प्रक्रिया काय?

दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून १९४९ मध्ये NATO चा जन्म झाला. ज्याची स्थापना मूळ नॉर्थ अटलांटिक कराराद्वारे झाली. कराराच्या कलम १३ मध्ये NATO मधून माघार घेण्याच्या प्रक्रियेची रूपरेषा देखील दिली आहे. त्यात २० वर्षांची अट आहे. हा करार २४ ऑगस्ट १९४९ रोजी अंमलात आला. त्यामुळे १९६९ नंतर कोणत्याही सदस्य देशाला यातून माघार घेण्याचा अधिकार प्राप्त झाला. परंतु करार रद्द करण्यासाठी किमान एक वर्ष आधी लेखी सूचना देणे बंधनकारक आहे. अमेरिकेला ही माहिती इतर सर्व सदस्य देशांना कळवावी लागेल. सूचना दिल्यानंतर बरोबर एका वर्षाने तो देश नाटोमधून पूर्णपणे बाहेर पडतो. यासाठी पुढील कोणत्याही मंजुरीची किंवा चर्चेची आवश्यकता नसते. ही तरतूद अतिशय सोपी आणि स्पष्ट आहे. यात कोणत्याही गुंतागुंतीच्या अटी किंवा नकाराधिकार नाहीत. केवळ एका वर्षाची पूर्वसूचना पुरेशी आहे.

अमेरिका कलम १३ अंतर्गत NATO तून बाहेर पडू शकतो?

ट्रम्प यांनी धमकी दिली आणि बाहेर पडले इतके अमेरिकेसाठी नाटो सोडणे सोपे नाही. कारण स्वत: अमेरिकेने ते कठीण बनवले आहे. २०२३-२४ साली अमेरिकन काँग्रेसने नॅशनल डिफेन्स ऑर्थराजइजेशन एक्ट १२५० ए पास केला होता. त्यावर माजी राष्ट्रपती ज्यो बायडन यांची स्वाक्षरी आहे. त्यात अमेरिकन राष्ट्रपती NATO मधून निलंबित, टर्मिनेट अथवा डिनाउंस अथवा बाहेर पडू शकत नाही. अमेरिकेला नाटोतून बाहेर पडण्यासाठी सीनेटमध्ये २/३ बहुमताची गरज आहे. या कामासाठी कोणताही निधी वापरता येणार नाही. हा कायदा विशेषतः ट्रम्प यांना रोखण्यासाठी तयार करण्यात आला होता.

दरम्यान, नाटो केवळ युरोपच्या सुरक्षेचाच नव्हे तर अमेरिकेच्या जागतिक सामर्थ्य प्रदर्शनाचाही आधार आहे असं आंतरराष्ट्रीय विषयाचे तज्ज्ञ JNU प्रोफेसर राजन कुमार यांनी सांगितले. अमेरिकेचे जवळपास १ लाख सैनिक युरोपात तैनात आहेत. इथले सैन्य तळ NATO शिवाय चालू शकत नाहीत. जर अमेरिका NATO तून बाहेर पडली तर लॉजिस्टिक्स, रिफ्ल्यूलिंग आणि ऑपरेशन्स खर्च वाढेल आणि आव्हाने उभी राहतील. नाटोचं ग्लोबल नर्वस सिस्टम इंटेलिजेंस शेअरिंग आहे. स्थानिक गुप्तचर यंत्रणातून रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि इराणसारख्या देशांविषयी गुप्त माहिती मिळते.  अटलांटिक कौन्सिल आणि बेलफर सेंटर यांच्या मते अमेरिका हे एकट्याने करू शकत नाही. 

Web Title : ट्रम्प की नाटो धमकी: खोखले शब्द? अमेरिका को भारी कीमत?

Web Summary : ट्रम्प की नाटो से बाहर निकलने की धमकी में बाधाएं हैं। अमेरिकी कानून के अनुसार, सीनेट की मंजूरी जरूरी है। नाटो छोड़ने से अमेरिका की वैश्विक शक्ति, यूरोपीय सैन्य उपस्थिति और खुफिया जानकारी खतरे में पड़ सकती है।

Web Title : Trump's NATO threat: Empty words? High cost for America?

Web Summary : Trump's NATO exit threat faces hurdles. US law restricts withdrawal, needing Senate approval. Leaving NATO jeopardizes US global power, European military presence, and intelligence sharing, impacting security.