शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News : कोरोनानं 90 हजार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले, हा तर 'बॅज ऑफ ऑनर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 15:11 IST

जगात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अमेरिकेत सापडणं हा 'बॅज ऑफ ऑनर' आहे.

ठळक मुद्देअमेरिकेत कोरोना विषाणूची एकूण 1,528,566 रुग्णांना बाधा झाली आहे. कोरोनामुळे अमेरिकेत 91,921 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत 91,921 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी देशातील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाढीला अभिमानाची गोष्ट म्हटलं आहे. 

वॉशिंग्टनः अमेरिकेत कोरोना विषाणूची एकूण 1,528,566 रुग्णांना बाधा झाली आहे. कोरोनामुळे अमेरिकेत 91,921 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचदरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी देशातील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाढीला अभिमानाची गोष्ट म्हटलं आहे. theguardian.comच्या अहवालानुसार ट्रम्प म्हणाले की, जगात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अमेरिकेत सापडणं हा 'बॅज ऑफ ऑनर' आहे. मला असं वाटतं की, काही प्रमाणात ही चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ आपली चाचणी करण्याची क्षमता खूप चांगली आहे.व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, "तुम्हाला माहिती आहेच की, कोरोना संक्रमितांच्या बाबतीत आम्ही जगात आघाडीवर आहोत, असे आपण म्हणता तेव्हा याचा अर्थ असा होतो की आमच्याकडे इतरांपेक्षा अधिक चांगली टेस्टिंग सुविधा आहे." कोरोना साथीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठकही घेतली. यापूर्वी कोरोनाबाबत अनेक वादग्रस्त विधानांचा सिलसिला कायम ठेवणारे ट्रम्प म्हणाले, 'आमच्याकडे बरेच रुग्ण सापडत आहे, मला त्यात काही वाईट दिसत नाही. आमची चाचणी करण्याची क्षमता खूप चांगली आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी असेही म्हटले आहे की, बर्‍याच व्यावसायिकांनी कोरोनाच्या संकटात चांगलं काम केलं असून, चाचणी करूनही घेतली आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राच्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत अमेरिकेने एक कोटी 26 लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. जगभरात अमेरिकेने नक्कीच सर्वात जास्त चाचण्या घेतल्या आहेत. पण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या Our World in Dataनुसार 'कॅपिटा बेसिस' वर जगातील पहिले स्थान नाही. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या Our World in Data चार्टमध्ये दर हजार लोकांमागे चाचण्या घेण्यात अमेरिका 16 व्या स्थानावर आहे. आइसलँड, न्यूझीलंड, कॅनडा प्रतिहजार लोकांच्या एकूण चाचणीच्या बाबतीत अमेरिकेपेक्षा पुढे आहेत.

हेही वाचा

Cyclone Amphan : तो येतोय..., चक्रीवादळाची चाहूल लागल्यानं घाबरलंय ओडिशा

CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प घेताहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध; तज्ज्ञ म्हणतात...

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात 6 कोटी लोक गरिबीच्या विळख्यात सापडणार

Coronavirus: अहो आश्चर्यम्! फक्त दोन वेदनाशामक औषधं घेऊन रुग्ण झाले ठणठणीत, प्रशासनही आश्चर्यचकीत

भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही; कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला

CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्या